Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांकडून इलेक्ट्रॉनिक्स दुकानात दरोडा टाकणारी 6 जणांची टोळी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे पिस्तुलाचा धाक दाखवून इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील रोख रक्कम चोरुन (Alephata Robbery) नेल्याची घटना सोमवारी (दि.7) रात्री दहा वाजता घडली होती. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Pune Crime) झाली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) आळेफाटा पोलिसांना (Alephata police station) यश आले आहे. या गुन्ह्यातील सहा आरोपींना अहमदनगर जिल्ह्यातून (Ahmednagar district) वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली.

 

ऋषीकेश बळवंत पंडीत (वय-22 रा. खरवंडी, खळवाडी, ता. नेवासा), अरबाज नबाब शेख (वय-20 रा. वडाळा व्हरोंबा, ता नेवासा), वैभव रविंद्र गोरे (वय-22 रा, खरवंडी, ता. नेवासा), राहुल राम चव्हाण (वय-20 रा. खरवंडी ता. नेवासा), प्रकाश विजय वाघमारे (वय-20 रा. माळी चिंचोरा, ता. नेवासा), शुभम बाळासाहेब शिंदे (वय-21 रा. खरवंडी, ता. नेवासा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अविनाश जालिंदर पटाडे (वय-41 रा. बोरी बु, ता. जुन्नर) यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

सोमवारी रात्री अविनाश पटाडे यांच्या आळेफाटा येथील नगर-कल्याण रोडवरील (Nagar-Kalyan Road) साई इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान (Electronics store) आहे. रात्री दहाच्या सुमारास चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. त्यानंतर पटाडे यांना बंदुकीचा (Gun) धाक दाखवून दुकानातील 21 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते.

 

या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी आळेफाटा पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेची (local crime branch) वेगवेगळी पथके तयार केली होती.
ही पथके तपास करत असताना त्यांना आरोपी बँड-डीजे व्यावसायाशी संबंधित असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याअनुषंगाने तपास केला.
आरोपींनी गुन्हा करताना घातलेल्या कपड्यांवरुन आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या
आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 72 तासाच्या आत अहमदनगर जिल्यातील नेवासा तालुक्यातून अटक केली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस (Pune Rural Police) अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Additional Superintendent of Police Mitesh Ghatte),
उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे (Sub-Divisional Police Officer Junnar Division Mandar Jawale)
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Police Inspector Ashok Shelke),
आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर (Police Inspector Pramod Kshirsagar),
सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधार (API Netaji Gandhar),

सुनिल बडगुजर (API Sunil Badgujar), पोलीस अंमलदार दिपक साबळे, राजु मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, दगडु विरकर, प्रसन्न घाडगे, प्रमोद नवले, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, राजेंद्र पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक रागिनी कराळे, पोलीस हवालदार चंद्रशेखर डुंबरे, विनोद गायकवाड, लहानु बांगर, अमित माळुजे, निखिल मुरूमकर, अरविंद वैद्य मोहन आनंदगावकर, हनुमंत ढोबळे, महेश काठमोरे, प्रशांत तांगळकर, गोरक्ष हासे ओतुर पोलीस ठाण्याचे (Otur Police Station) पोलीस उपनिरीक्षक अनिल कोरुरकर, पोलीस हवालदार महेश मराठे तसेच जुन्नर पोलीस ठाण्याचे (Junnar Police Station) पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जोशी यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | A gang of 6 people who robbed an electronics shop from alephata has been arrested by pune rural police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mumbai Crime | ACP दिपक फटांगरे आणि IPS देवेन भारती यांच्यावर FIR; जाणून घ्या प्रकरण

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 77 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्‍यांना मिळू शकते नवीन वर्षात मोठी भेट! सरकार पुन्हा DA मध्ये करू शकते वाढ