Pune Crime | मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तावर असताना रिक्षाची पोलिसाला धडक; कर्मचारी गंभीर जखमी

पुणे : Pune Crime | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे पुण्यातील गणपती मंडळाच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी बुधवारी पुण्यात आले होते (Pune Accident News). त्यावेळी बंदोबस्त (Police Bandobast) करत असलेल्या पोलीस कर्मचार्‍याच्या (Pune Police) अंगावर रिक्षा घालून त्यांना गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी पोलीस शिपाई श्रीनाथ संपत कांबळे Police Shreenath Sampat Kamble (वय ३६, रा. लोहगाव – Yerwada) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४३६/२२) दिली आहे. त्यानुसार, सिद्धेश्वर बसवेश्वर पुजारी (वय ३३, रा. मांगडेवाडी) या रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सादलबाबा चौकात बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौर्‍यावर येत असल्याने श्रीनाथ कांबळे हे सादलबाबा चौकात वाहतूक नियोजन करीत
होते. यावेळी रिक्षाचालकाने कांबळे यांच्या पाठीमागून उलट्या दिशेने रिक्षा चालवत आणून त्यांना धडक दिली.
त्यात कांबळे यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A rickshaw hit the police while on the CM’s guard; The employee was seriously injured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Ganesh Visarjan-2022 | पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, तरुणाईचा जल्लोष

Mumbai Crime | चक्क मुलानेच बाप्पाला लुटले; गळ्यातील हार चोरुन झाला पसार

Rain in Maharashtra | पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती