Rain in Maharashtra | पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rain in Maharashtra | राज्यात मागील काही दिवसांच्या विश्रांतीनतर पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सायंकाळी मुंबई (Mumbai) आणि ठाण्यात (Thane) ढगफुटीसदृश पाऊस झाला. तासाभरात तब्बल 71 मिमी पावसाची नोंद झाली असून मुसळधार पावसामुळे (Rain in Maharashtra) मध्य रेल्वेची वाहतूक (Central Railway) कोलमडली आहे. त्यात आता राज्यातील पाऊस परिस्थिती संदर्भात हवामान खात्याने (Meteorological Department) अलर्ट जाहीर केला आहे.

 

पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस
राज्यात येत्या पाच दिवसांत मुसळधार पावसाचा (Rain in Maharashtra) ईशारा हवामान खात्याने दिला आहे. शुक्रवार पासून मुंबई आणि ठाणे परिसरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य व लगतच्या पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर ओडिशा, महाराष्ट्र आणि दक्षिण द्वीपकल्पीय भागात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाचा (Heavy Rain) जोर कायम राहण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील पाच दिवसांत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

दरम्यान, काल राज्यात कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांसह विदर्भातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह ढगपुठीसदृश पाऊस झाला.
शुक्रवारी राज्यात गणपती विसर्जन (Ganesha Immersion) होणार आहे.
गणेश विसर्जनावर पावसाचे सावट निर्माण झाल्याने याचा परिणाम वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Rain in Maharashtra | heavy rain in all over these parts of maharashtra in next 5 days said imd

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cardiac Arrest | माता पार्वती बनून नाचणार्‍या व्यक्तीला आला हार्ट अटॅक… स्टेजवरच मृत्यू, Video

 

Nashik ACB Trap | 3000 हजार रुपये लाच घेताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

NEET Exam Result | नीट परीक्षेत दुसऱ्यांदा कमी मार्क मिळाले, रोहिणीने जीवनयात्रा संपवली