Pune Crime | जेष्ठ नागरिकाची चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या; धक्कादायक कारण आले समोर

पुणे : Pune Crime | मुलगा चांगला उच्च शिक्षित अन न्यायाधीश (Judge) पण त्यांच्या वैवाहिक जीवनात एकमेकांचे पटले नाही. दोघे जण विभक्त झाले. आजोबांना मात्र आपल्या नातीचा लळा लागला होता. ते सूनबाईकडे नातीला भेटायला गेले तर त्यांना धक्काबुक्की करुन हाकलून दिले. त्यांच्या आजारपणातही नातीला भेटून न दिल्याने त्यांनी कंटाळून घराच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी संदिप नामदेव सरोदिया Sandeep Namdev Sarodia (वय ५२, रा. बाणेर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४४६/२२) दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी त्यांची पत्नी शालिनी ऊर्फ शिवानी (Shalini alias Shivani), सासू मनीलता शर्मा (Manilata Sharma) व मेव्हणा शेखर शर्मा Shekhar Sharma (सर्व रा. बाणेर) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
हा प्रकार बाणेरमध्ये 3 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2018 दरम्यान घडला होता. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पूर्वीची पत्नी यांच्यात घटस्फोट (Divorce) झाला आहे.
3 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांचे वडिल नामदेव सरोदिया (Namdev Sarodia) हे नातीला भेटायला आपल्या सूनेच्या घरी गेले होते.
तेव्हा त्यांना धक्काबुक्की करुन घराबाहेर हाकलून दिले.
त्यानंतर फिर्यादीचे वडिल आजारी असताना त्यांनी नातीला भेटण्याची इच्छा व्यक्ती केली.
परंतु, सुनेने त्यांना भेटू दिले नाही. या बाबीचा त्यांच्या वडिलांच्या मनावर आघात झाला.
तसेच आरोपी यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली व घराच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांनी लिहून ठेवलेली सुसाईड नोटचा अहवाल प्राप्त झाला.
तसेच फिर्यादी यांच्या आईवर उपचार सुरु असल्याने त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड (Assistant Police Inspector Gaikwad) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A senior citizen committed suicide by jumping from the fourth floor; A shocking reason came to the fore

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा