Pune Crime | किरकोळ कारणावरून खुनाचा प्रयत्न, लोहगाव परिसरातील घटना

पुणे : Pune Crime | घरासमोर मोठमोठ्याने आरडाओरडा करणार्‍यास समजविण्यास गेलेल्या नागरिकावर गुंडाने (Criminal) चाकूने वार करुन जीवे ठार करण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime)

याप्रकरणी पोलिसांनी सनी देवराम कासारे ऊर्फ भंडारी Sunny Devram Kasare alias Bhandari (वय २४, रा. रामनगर, हडपसर) याला अटक (Arrest) केली आहे. त्याचा साथीदार सतिश बाळासाहेब जाधव Satish Balasaheb Jadhav (वय ३२, रा. कलवड वस्ती, लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत कोमल मनिष पुजारी Komal Manish Pujari (वय २५, रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४५६/२२) दिली आहे. हा प्रकार रामनगरमध्ये मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश जाधव व सनी कासारे हे फिर्यादीच्या दारात मोठमोठ्याने
आरडाओरडा करत होते. तेव्हा फिर्यादीचे पती मनिष यांनी आमच्या दारात ओरडू नका, असे सांगत होते.
तेव्हा त्यांच्या सासू समजावण्यासाठी आल्या. त्यांना सतिश जाधव यांनी शिवीगाळ केली.
त्यावर मनिष यांनी शिवीगाळ का करतो, असे विचारले असता त्याचा राग येऊन सनी कासारे याच्याकडून चाकू
घेऊन सतिश याने मनिष यांच्या डाव्या काखेच्या खाली वार करुन गंभीर जखमी केले.
मनिष यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक गावडे
(Sub-Inspector of Police Gawde) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | Attempt To Kill Murder In Pune Lohegaon Area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update