Pune Crime | पती पत्नीचा वाद मिटविण्यासाठी आलेल्या पोलीस कर्मचार्‍याला मारहाण; वारजे पोलिसांकडे FIR

पुणे : Pune Crime | भर रस्त्यात पतीपत्नीचा वाद सुरु असल्याने त्यांना समजावून सांगणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला (Pune Police) मारहाण (Beating) करण्याचा प्रकार हिंगणे होम कॉलनीत घडला. (Pune Crime)

याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi Police Station) गोविंद नागनाथ सुरवसे Govind Nagnath Suravse (वय ३५, रा. मुर्टा नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) याला अटक केली आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक सागर जगताप (Police Naik Sagar Jagtap) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. ४४३/२२) दिली आहे. हा प्रकार हिंगणे होम कॉलनीकडे जाणार्‍या सार्वजनिक रोडवर सोमवारी रात्री सव्वा दहा वाजता घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद सुरवसे याचे पत्नी सायली सुरवसे याच्याबरोबर
घटस्फोटाच्या कारणावरुन हिंगणे होम कॉलनीतील सार्वजनिक रोडवर भांडणे सुरु होती.
इतक्या रात्री सार्वजनिक रोडवर सुरु असलेली भांडणे पाहून तेथून जाणार्‍या नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.
त्यानुसार सागर जगताप व पोलीस शिपाई चव्हाण हे घटनास्थळी पोहचले.
त्यांनी गोविंद सुरवसे याला समजावून सांगत असताना त्याने फिर्यादी यांची कॉलर पकडून त्यांना ढकलून देऊन
हाताने मारहाण करत मोठमोठ्याने शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर पोलिसांनी त्याला मोटारसायकलवरुन बसवून पोलीस चौकीत नेण्याचा प्रयत्न केला असताना
त्याने मोटारसायकलला लाथा मारुन शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणल्याने त्याला अटक
करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक सावंत (Sub-Inspector of Police Sawant) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | Beating up a policeman who came to settle a dispute between husband and wife; FIR with Warje police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actress Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीने ठोठावले केरळ उच्च न्यायालयाचे दरवाजे, जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?

Shradha Walker Murder Case | दिल्ली मर्डर प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळेची पोस्ट चर्चेत ; मेरा अबदुल ऐसा नही म्हणत…