Pune Crime | ताडपत्री चोरण्याचा जाब विचारल्याच्या रागातून रॉडने मारहाण, कोंबडी पुलावरील घडना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दुकानातील ताडपत्री चोरत आहात का? असा जाब विचारल्याच्या रागातून दोघांनी दूकानमालकाला रॉडने मारहाण (Beating) करीत जिवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. ही  घटना (Pune Crime) रविवारी (दि.16) रात्री मंगळवार पेठेतील कोंबडी पुलावर घडली.

आरीफ शेख, आकाश रजपूत (दोघे. रा. मंगळवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.  अमीर फारूख शेख (वय-23, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

अमीर हे मंगळवार पेठेतील कोंबडी पूलावर ताडपत्री विकण्याचा व्यवसाय करतात.
आरोपी आरीफ आणि आकाश रजपूत हे दोघे अमीरच्या दुकानाजवळ उभे होते.
त्यावेळी आरोपी ताडपत्री चोरून नेत असल्याची माहिती अमीरला दूकानाशेजारील एकाने दिली.
तुम्ही माझ्या दुकानातील ताडपत्री चोरत आहात का? असे आरोपींना विचारले.
याचा राग आल्याने आरीफ आणि आकाश यांनी अमीर यांना मारहाण केली. लोखंडी रॉडने अमीरला मारहाण करीत जखमी केले. आरीफ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग (API Manoj Abhang) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Beating with a rod out of anger for being asked to answer for stealing tarpaulin, the incident at Kombadi Bridge

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma Andhare | सुषमा अंधारे माध्यमांचे आवडते बाळ आहेत, भाजपचा खोचक टोला

Rain in Pune | जयंत पाटलांचा भाजपाच्या स्थानिक कारभार्‍यांना चपराक, म्हणाले – ‘पुण्याच्या नव्या शिल्पकारांचा विकास वाहून गेला’

Ajit Pawar | राजन विचारेंच्या जीवाला धोका, पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रावर अजित पवार म्हणाले…