Pune Crime | दरोडयाच्या तयारीत असलेल्या 6 जणांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

पुणे (Pune Crime) : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | धारदार शस्त्रे व मिरची पावडर घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या 6 जणांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी (bharti vidyapeeth police) सापळा रचून अटक केली. दरोड्याचा कट यामुळे उधळला आहे. सनी महादेव डेंगळे (वय 19), भुजंग महादेव डेंगळे (वय 24, दोघेही रा. कात्रज) अजय बिरमल शिंद (वय 22), विकास भिमराव माशाळे (वय 20) याना अटक केली आहे. तर त्यांच्या दोन साथीदारांवर भारती विद्यापीठ पोलिसांनी (bharti vidyapeeth police) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई गणेश काळे यांनी फिर्याद दिली आहे.

सनी डेंगळे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. वाढत्या गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी भारती विद्यापीठ पोलीस हद्दीत गस्त घालत होते. यादरम्यान कात्रज-कोंढवा रस्त्यावर (Katraj-Kondhwa Road) गोकुळनगर चौकातील (Gokulnagar Chowk) स्वामी समर्थनगर चौकाजवळ काहीजण कोयते, पालघन, मिरची पावडर घेऊन दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसले आसल्याचे समजले. त्यानुसार पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior police inspector Jagannath Kalaskar), पोलीस निरीक्षक संगीता यादव (Police Inspector Sangita Yadav), पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्यांना पकडले. मात्र दोन आरोपी हे पसार झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्री हा थरार घडला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक जी. जी. घावटे (API G.G. Ghavte) तपास करत आहे.

हे देखील वाचा

PM kisan | शेतकर्‍यांना आता दरवर्षी 6000 च्या ठिकाणी मिळतील 36000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या

Pune Anti Corruption | जिल्हयातील विशेष न्यायालयातील अतिरिक्त सरकारी वकिल लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Bharti Vidyapeeth police arrested a gang of 6 persons who were preparing for a robbery

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update