Pune Crime | बाईक स्टंक करणे पडले महागात, वीजेच्या खांबाला धडकून गमावला जीव; पुण्यातील घटना

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime |बाईकवर स्टंटबाजी करणे तरुणांच्या जीवाशी बेतल्याच्या घटना अनेक घडल्या आहेत. मात्र, तरुणांकडून बाईक स्टंट (Bike Stunt) करणे सुरुच आहे. पुण्यात (Pune Crime) घडलेल्या अशाच एका घटनेत बाईवर स्टंट करणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना चंदननगर (Chandannagar) परिसरात मंगळवारी रात्री घडली आहे. प्रमोद कृष्णा बोलके (वय-29 रा. वडगाव शेरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रमोद बोलके आणि त्याचा मित्र चंदननगर बीआरटी (BRT) बसस्थानकामधून जात होते.
त्यावेळी प्रमोद हा त्याच्याकडे असलेली भरधाव वेगात चालवल्याने स्पीड ब्रेकर वरून गाडी उडाली आणि वीजेच्या खांबाला जाऊन धडकली.
यामध्ये प्रमोदचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र विशाल कुमार (वय-29) हा गंभीर जखमी झाला आहे.
त्याने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास प्रमोद आणि त्याचा मित्र विशाल दुचाकीवरुन खुळेवाडीच्या दिशेने जात होते.
त्यावेळी प्रमोदने भरधाव वेगात दुचाकी चालवल्यामुळे स्पीड ब्रेकरवर (speed breaker) गाडी उडाली. त्यामुळे खांबाला धडकून प्रमोद आणि विशाल हे दोघे गंभीर जखमी झाले.
प्रमोदला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.व्ही. बिडवे (PSI M.V. Bidway) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | bike accident killed youth in chandannagar of pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Municipal Corporation Elections | आगामी पालिका निवडणुकीत BJP सत्तेपासून दूर? महाविकास आघाडी एकत्र लढणार?

Corona in Pune | लसीकरणानंतरही पुणे जिल्ह्यात आढळले 7 हजार 636 ‘कोरोना’बाधित

Sandwich Pregnancy | सँडविचमुळे महिला झाली प्रेग्नंट? खाताच केली प्रेग्नंसी टेस्ट तर निघाली 5 महिन्यांची गरोदर