Pune Crime  | पीएमपीएल बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, बसचालकाविरुद्ध FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime  | भरधाव पीएमपीएल बस चालकाने (PMPL Bus) दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार झाला. हा अपघात 11 ऑक्टोबरला सकाळी नउच्या सुमारास चंदननगर ते खराडी बायपास (Chandannagar to Kharadi Bypass) परिसरात घडला. याप्रकरणी बसचालकाविरूद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल (Pune Crime)  केला आहे.

प्रकाश शंकरन शर्मा Prakash Sankaran Sharma (वय -38, रा. आव्हाळवाडी, वाघोली) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शंकरन शर्मा (वय ७०) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) तक्रार दिली आहे. (Pune Crime)

प्रकाश हे 11 ऑक्टोबरला सकाळी नऊच्या सुमारास दुचाकीवरून कामाला चालले होते. त्यावेळी भरधाव पीएमपीएल बस चालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या प्रकाशचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. कोळळुरे (PSI S. S. Kolure) तपास करीत आहेत.

Web Title –  Pune Crime | Bike rider killed in collision with PMPL bus, FIR against bus driver

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा