Pune Crime | उधार सिगारेट न दिल्याने मुलावर कोयत्याने सपासप वार, 4 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अगोदर घेतलेल्या सिगारेटचे पैसे न दिल्याने पुन्हा सिगारेट देण्यास नकार दिल्याने चौघा जणांच्या टोळक्याने पान टपरीवर दगडफेक केली. पानटपरी चालकाच्या मुलावर कोयता व पालघने वार (Pune Crime) करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला.

याप्रकरणी ओमप्रकाश विद्याधर शुक्ला Omprakash Vidyadhar Shukla (वय ४७, रा. गांधीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४८६/२२) दिली आहे. त्यावरुन चौघा टोळक्यांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार येरवड्यातील गांधीनगर कॉर्नरवरील शिवशक्ती पान शॉप या दुकानात ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश शुक्ला यांची शिवशक्ती पान शॉप ही पानटपरी आहे.
त्यांच्या पान टपरीत येऊन चौघे मुले सिगारेट घेऊन जात़ पैशांची मागणी केल्यावर शिवीगाळ करुन मारहाणीची धमकी देत. हे टोळके ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आले. त्यांनी पैशाशिवाय सिगारेट देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी पानटपरीवर दगडफेक करुन पळून गेले. त्यानंतर साडेसात वाजता पुन्हा आले. फिर्यादी यांचा मुलगा अनुराग शुक्ला यांच्या डोक्यात कोयता व पालघनने वार करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
पोलीस उपनिरीक्षक गुरव तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Boy stabbed with a knife for not giving borrowed cigarettes, FIR against 4 persons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा