Pune Crime Branch | मोक्का गुन्ह्यात दोन वर्ष फरार असलेल्या आरोपीला पुणे गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch | वारजे पोलीस ठाण्यातील (Warje Malwadi Police Station) रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Pune Police Record) मोक्का कारवाई (MCOCA Action) केल्यानंतर फरार झाला होता. पोलीस मागील दोन वर्षापासून शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने (Anti Extortion Cell Pune) आरोपीला सोलापूर (Solapur) येथून अटक केली आहे. सिद्राम उर्फ अभी रमेश मंजिली (वय- 24) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वारजे पोलीस ठाण्यात 2022 मध्ये दाखल असलेल्या आयपीसी 307, 504, 506, 34, आर्म ॲक्ट गुन्ह्यात
मोक्का कायद्याचा अंतर्भाव करण्यात आला होता. मोक्का कारवाई झाल्यानंतर आरोपी मंजिले फरार झाला होता. पोलीस त्याचा दोन वर्षापासून शोध घेत होते. आरोपी सिद्राम उर्फ अभी मंजिले हा सोलापूर, रविवार पेठत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस नाईक राजेंद्र लांडगे व पोलीस हवालदार अमोल आवाड यांना मिळाली. माहितीची खातरजमा करून खंडणी विरोधी पथक एक चे पोलीस उप निरीक्षक यशवंत ओंबासे व टीमने सोलापूर येथे जाऊन आरोपीला बालाजी चौकात सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील तपासासाठी वारजे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.(Pune Crime Branch)

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलीस उप आयुक्त गुन्हे
अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनील तांबे (ACP Sunil Tambe) व
खंडणी विरोधी पथक 1 चे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (PI Krantikumar Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक यशवंत ओंबासे, पोलीस हवलदार सयाजी चव्हाण, अमोल आवाड, राजेन्द्र लांडगे, अमर पवार
यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amit Shah On Uddhav Thackeray | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान, ”महाराष्ट्रासमोर CAA वर भूमिका स्पष्ट करा”

Merged Villages In PMC | समाविष्ट 34 गावांतील मिळकत कर थकबाकी आणि शास्ती माफीचे आश्‍वासन हे केवळ ‘राजकिय’ फायद्यासाठीच!

FIR On Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांची मोठी कारवाई; 80-90 जणांवर 2 ठिकाणी गुन्हे दाखल