Pune Crime Branch | मोबाईल व वाहन चोरी करणारा सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch | पुणे शहर परिसरात मोबाईल फोन (Mobile Theft) व वाहन चोरी (Vehicle Theft) करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला (Criminal On Police Records) गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन हडपसर (Hadapsar Police Station) व मुंढवा पोलीस ठाण्यातील (Mundhwa Police Station) गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई आकाशवाणी हडपसर (Akashwani Hadapsar) येथे सापळा रचून करण्यात आली. (Pune Crime Branch)

वैभव नागनाथ बिनवडे (वय-20 रा. सय्यदनगर, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार विनोद शिवले व शशिकांत नाळे यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार वैभव बिनवडे याने हडपसर परिसरात मोबाईल चोरी केली आहे. चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आकाशवाणी येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन मोबाईल व दुचाकी असा एकूण 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर
(ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे (Sr PI Vishwajit Kaingade),
पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, दया शेगर, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख व
पल्लवी मोरे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | पुणे: लाच घेताना ग्रामसेवक पुणे अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune CP Amitesh Kumar | ‘रस्त्यावर महिलांची छेड काढणाऱ्याच्या मुसक्या आवळणार’ – पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Video)