Pune Crime Branch Police | बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात FIR दाखल

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  बेकायदेशीररित्या पिस्तुल (illegal pistol) घेऊन फिरणाऱ्या एकाला पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Crime Branch Police) सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त (Recover Pistol and 2 Cartridges) करण्यात आली आहेत. अक्षय दिलीप रावडे (वय २७, रा. फ्लॅट न. २०२, उत्सव बिल्डिंग, किरकीटवाडी ता. हवेली) (Akshay Dilip Rawade) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (sinhagad road police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) खंडणी विरोधी पथक – 1 ने ही कारवाई केली आहे. Crime Branch arrests person carrying illegal pistol, FIR lodged at Sinhagad Road Police Station

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व पाहिजे आरोपी व सराईत गुन्हेगाराचा माग काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यानुसार गुन्हे शाखा हद्दीत गस्त घालत आहे.
यादरम्यान खंडणी विरोधी पथक एकच्या पथकातील पोलीस नाईक राजेंद्र लांडगे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एकजण पिस्तुल घेऊन फिरत आहे.
त्यानुसार पथकाने नर्हे परिसरात सापळा रचून अक्षय रावडे याला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल व 2 जिवंत काडतुसे मिळून आली.
ती जप्त करत त्याला अटक केली आहे.
त्याने पिस्तुल कोठून आणले आणि तो याचा वापर कशासाठी करणार होता.
याबाबत माहिती घेतली जात आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे (additional commissioner of police ashok morale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shriniwas ghadge), सहाय्यक आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गगदर्शनाखाली विठ्ठल पाटील, सहाय्यक निरीक्षक संदीप बुवा, कर्मचारी नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, विवेक जाधव, प्रफुल्ल चव्हाण, गजानन सोनवलकर, विजय कांबळे, हनुमंत कांदे, पिराजी बेले यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : Pune Crime Branch Police | Crime Branch arrests person carrying illegal pistol, FIR lodged at Sinhagad Road Police Station

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Honey Trap | Facebook द्वारे सेक्स चॅट अन् न्यूड व्हिडीओ कॉल, हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा धोका वाढला