Pune Crime Branch | पुणे : पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Branch | बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक (Anti Extortion Cell Pune) एकने अटक केली आहे. आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत (Pistol Seized). ही कारवाई शुक्रवारी (दि.22) कर्वेनगर (Karve Nagar Pune) येथील भुजबळ बंगल्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत केली. (Pune Crime Branch)

सुरज रोहिदास खंडागळे (वय-30 रा. म्हाडा कॉलनी, वारजे, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) आर्म अॅक्ट सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण यांना माहिती मिळाली की, भुजबळ बंगल्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानावर एक जण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून सुरज खंडागळे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेऊन देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनिल तांबे
(ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (PI Krantikumar Patil),
सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील (API Abhijit Patil), पोलीस अंमलदार विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण,
अमर पवार, नितीन कांबळे, रविंद्र फुलपगारे, प्रवीण ढमाळ, संजय भापकर, अमोल आवाड यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik City Police | नाशिक : गोवंश मासाची वाहतुक विक्री करणाऱ्या 8 गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई (Video)

Shivsena UBT On Modi Govt | …तर केजरीवाल अजित पवारांसारखे भाजपाचे नवे शंकराचार्य झाले असते, ठाकरेंच्या शिवसेनेचा मोदी सरकारवर घणाघात

Pune Crime News | पुणे : भांडण सोडवणं बेतलं जीवावर, मारहाणीत 57 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू