Pune Crime News | पुणे : भांडण सोडवणं बेतलं जीवावर, मारहाणीत 57 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सुरक्षा रक्षकाला मारहाण करत असताना मध्यस्थी करणाऱ्या एका जेष्ठ व्यक्तीला देखील मारहाण करण्यात आली. यामध्ये जखमी झाल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार 20 मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रास्ता पेठेतील ताराचंद हॉस्पिटलच्या (Tarachand Hospital Pune) गेटसमोर झाला होता. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Samarth Police Station) चार जणांना अटक केली आहे.

धनंजय तिवारी (वय-57) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत अशोक नर्वदा सिंग (वय-35 रा. संतोषनगर, कात्रज) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रसाद नाथा सुर्यवंशी (वय-18 रा. कसबा पेठ, पुणे), अब्बास सलीम शेख (वय-19 रा. कसबा पेठ, पुणे), सोमेश प्रताप शिंदे (वय-29 रा. शिंदे वाडा, कसबा पेठ), शोएब सईद शेख (वय-34 रा. साईबाबा नगर, कोंढवा) यांच्यावर आयपीसी 304, 324, 323, 504, 506, 143, 147, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.(Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराचंद हॉस्पिटल समोरील गेटवर भारत सिक्युरिटी कंपनीचे सिक्युरिटी गार्ड अनुप सिंग हा ड्युटी करत होता.
त्यावेळी दुचाकीवरुन सोमेश व यश आले.
त्यांनी त्यांची दुचाकी गेटसमोर उभी केल्याने अनुप सिंग यांनी दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले.
याचा राग आल्याने दोघांनी अनुप सिंग याला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यानंतर सोमेश याने अब्बास, आर्य़न, निल्या, प्रसाद व प्रेम साठे यांना तीन दुचाकीवरुन घेऊन आला.
आरोपींनी अनुप सिंग याला शिवीगाळ कर मारहाण करु लागले. त्यावेळी फिर्यादी अशोक सिंग व त्यांचे मालक मयत धनंजय तिवारी हे भांडण सोडवण्यासाठी असता आरोपींनी रोडवरील पीओट ब्लॉक फेकून मारले. यात अनुप सिंग याच्या खांद्याजवळ व अंगावर ओरखडे व मुका मार लागला. धनंजय तिवारी यांना भांडण सोडवत असताना केलेल्या मारहाणीमुळे त्यांना त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादी नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik City Police | नाशिक : गोवंश मासाची वाहतुक विक्री करणाऱ्या 8 गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई (Video)

Shivsena UBT On Modi Govt | …तर केजरीवाल अजित पवारांसारखे भाजपाचे नवे शंकराचार्य झाले असते, ठाकरेंच्या शिवसेनेचा मोदी सरकारवर घणाघात

Shivajirao Adhalrao Patil – Amol Kolhe | शिरूरमध्ये रंगणार अमोल कोल्हे विरूद्ध आढळराव पाटील सामना

PM Modi On Moscow Attack | रशियात दहशतवादी हल्ला; 70 ठार, 115 जखमी, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून निषेध