×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | सराईत गुन्हेगार तुषार हंबीर याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये हल्ला...

Pune Crime | सराईत गुन्हेगार तुषार हंबीर याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये हल्ला करणाऱ्या नोन्या वाघमारे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 97 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या (Bund Garden Police Station) हद्दीत दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार प्रतीक उर्फ नोन्या संजय वाघमारे आणि त्याच्या 11 साथिदारांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का MCOCA Action) Mokka कारवाई करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी दिले आहेत. आयुक्तांनी आजपर्यंत 97 आणि चालु वर्षात 34 टोळ्यांवर मोक्का (Pune Crime) कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख प्रतीक उर्फ नोन्या संजय वाघमारे Prateek aka Nonya Sanjay Waghmare (वय-22 रा. बनकर कॉलनी, हडपसर), टोळी सदस्य सागर हनुमंत ओव्हाळ (वय-22),बालाजी हनुमंत ओव्हाळ (वय- 23 दोघे रा. शांतीनगर वसाहत, हडपसर), सुरज मुक्तार शेख (वय-19 रा. भेकराई नगर, हडपसर), सागर बाळासाहेब आटोळे (वय-21 रा. वडकी, पुणे), ऋतीक उर्फ बबलु राजु गायकवाड (वय-19 रा. बनकर कॉलनी, हडपसर), अनिल अंकुश देवकते (वय-22 रा. देवाची उरुळी), गालीब उर्फ समीर मेहबुब आत्तार (वय-19 रा. काळेपडळ, हडपसर), प्रकाश रणछोड दिवाकर उर्फ प्रकाशदास रणछोड दास वैष्णव (वय-26 रा. तिरंगा चौक, ऊरुळी देवाची), परवेज उर्फ साहिल हैदरअली इनामदार (वय-21 रा. ऊरुळी देवाची) यांना अटक करण्यात आली आहे. तर तम्मा उर्फ रोहीत सुरेश धोत्रे (रा. वडार वस्ती, पुणे, साहील शेख उर्फ छोटा साहील (रा. हडपसर) हे दोघे फरार आहेत. यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे.

या टोळीने मोक्का गुन्ह्यातील येरवडा कारागृहात (Yerawada Jail) असलेल्या सराईत गुन्हेगार तुषार हंबीर (Tushar Hambir) याला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्यावर उपचार सुरु असताना 5 सप्टेंबर रोजी हल्ला (Attack) केला होता. आरोपींवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात आयपीसी 307, 353, 332, 120(ब), 141, 143, 144, 147, 148, 149, आर्म अ‍ॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्ट (Maharashtra Police Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. यामध्ये मोक्का कलमाचा समावेश करण्यात आला आहे. (Pune Crime)

प्रतीक उर्फ नोन्या वाघमारे याने त्याच्या 11 साथीदारांनी पुणे शहरात टोळीचे वर्चस्व व दहशत कायम रहावे यासाठी खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), खंडणी (Extortion), खंडणीसाठी अपहरण (Kidnapping), दरोडा (Robbery), जबरी चोरी, घरफोडी (Burglary), विनयभंग (Molestation), पळवून नेणे, विक्रीसाठी अंमली पदार्थ बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र, त्यांच्यात कोणतीही सुधारणा झाली नाही आणि त्यांनी पुन्हा गंभीर गुन्हे केले आहेत.

प्रतीक उर्फ नोन्या वाघमारे आणि त्याच्या टोळीवर मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव बंडगार्डन पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (Senior Police Inspector Pratap Mankar) यांनी
पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil) यांच्यावतीने अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे
(Addl CP Rajendra Dahale) यांना पाठवला होता.
त्यानुसार टोळी प्रमुख प्रतिक उर्फ नोन्या वाघमारे आणि त्याच्या टोळीतील 11 असे एकूण 12 जणांवर
मोक्का कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
पुढील तपास लष्कर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आर. एन. राजे (ACP R. N. Raje) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील,
सहायक पोलीस आयुक्त आर. एन. राजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर,
पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी सातपुते (Police Inspector Ashwini Satpute),
पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे (PSI Rahul Nalkande) पोलीस अंमलदार नितीन जगताप, किरण तळेकर, सतिष मुंढे यांनी केली.

Web Title :- Pune Crime | Commissioner Amitabh Gupta’s 97th action till date against Nonya Waghmare and his gang ‘Mokka’ who attacked Sarait criminal Tushar Hambir at Sassoon Hospital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena | कमळाबाई आणि ‘मिंधे’ गट म्हणत शिवसेनेची खरमरीत टीका, राजकीय स्वार्थासाठी घटनात्मक संस्थांना राजकीय अड्डे…

Supreme Court On Marital Rape Case | मोठी बातमी ! अविवाहित महिलांना सुद्धा MTP अ‍ॅक्ट अंतर्गत गर्भपाताचा अधिकार, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Bug In Whatsapp | व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलेल्या धोकादायक बग बाबत CERT ने जारी केला अलर्ट, डाटा लीक होण्याचा धोका

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News