Pune Crime Court News | अनैतिक संबंधातून प्रियकराच्या खुनाच्या गुन्ह्यात महिला आरोपीची निर्दोष मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Court News | अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) प्रियकराचा खून (Murder Of Lover) केल्याच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.व्ही कश्यप (Judge D. V. Kashyap) यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी आरोपी व मयत यांच्यामध्ये अनैतिक प्रेमसंबंध होते व त्यातील वादातून आरोपी महिलेने प्रियकराचा खून केल्याच्या आरोपाखाली शिरूर पोलीस स्टेशन (Shirur Police Station) येथे फिर्याद दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास करून शिरूर पोलिसांनी आरोपीवरुद्ध आयपीसी 302 कलमाखाली जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. शिरीष पाटील (Adv Shirish Patil) यांनी कोर्टात बाजू मांडली.(Pune Crime Court News)

या प्रकरणामध्ये सरकारी पक्षाच्या केस प्रमाणे आरोपी व मयत यांचे अनैतिक प्रेम संबंध होते. घटनेच्या दिवशी मयत हा आरोपीच्या घरी मुक्कामास आला असता, रात्रीच्या वेळी आरोपीने भांडणातून प्रियकराचा खून केला, असा आरोप सरकारी पक्षाने आरोपी विरुद्ध केला होता. आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना आरोपीच्या वकिलांनी, सरकारी पक्षाने घटनेचे नेमके ठिकाण सिद्ध करु शकला नाही.

घटनास्थळ पंचनामाबाबत शंका निर्माण करणारा पुरावा कोर्टासमोर आला. तसेच, घटनास्थळी महत्त्वाच्या पुराव्याबाबत छेडछाड होईल, अशी परिस्थिती होती.
पोलिसांनी त्याबाबत योग्य ती काळजी घेतली नाही, ज्या घरात घटना घडली असल्याचे आरोप होते, त्या घराशेजारील
कोणीही घटना प्रत्यक्ष पाहिली किंवा आवाज ऐकला, असा एकही साक्षीदार तपासात आढळून आला नाही.
या गुन्ह्यातील आरोपीची अटक ही संशयास्पद आहे. त्यामुळे अशा परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीला शिक्षा करणे योग्य नसल्याचे आरोपीच्या वकिलांनी केला.

अ‍ॅड. शिरीष पाटील यांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन खुनाच्या खटल्यातील महिला आरोपीची सबळ पुराव्या
अभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. शिरीष पाटील,
अ‍ॅड. अमोल जगताप (Adv Amol Jagtap) यांनी कामकाज पाहिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : जादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना 25 लाखांचा गंडा

Maval Lok Sabha | मतदानाच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील सुरक्षा व्यवस्थेचा दीपक सिंगला यांचेकडून आढावा

Ravindra Dhangekar | विविध संस्था-संघटनांचा रवींद्र धंगेकरांना पाठिंबा