Pune Crime Court News | पुणे : विशेष मुलीच्या खाणाखुणांद्वारे दिलेली साक्ष ठरली टर्निंग पॉईंट, बलात्कार करणाऱ्या 59 वर्षीय नराधमाला 10 वर्षाची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Court News | विशेष मुलीवर झालेल्या बलात्कार (Rape Case Pune) प्रकरणात मुलीने खाणाखुणांनी न्यायालयात साक्ष दिली. पीडित मुलीची साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरली. न्यायालयाने 59 वर्षीय नराधमाला दोषी ठरवून जिल्हा सत्र न्यायाधीश डी.पी. रागीट (Judge D. P. Ragit) यांनी आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व दहा 10 हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले. तसेच दंड न भरल्यास एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद निकालपत्रात केली आहे.

प्रताप बबनराव भोसुरे (वय-59 रा. धानोरे, ता. शिरुर, जि. पुणे) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात पीडित मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 18 मे 2015 रोजी घडली होती. पीडित मुलगी रानात शेळ्यांना घेऊन गेली होती. आरोपी भोसुरेने तिला गोळी देण्याचे आमिष दाखवून रानातील एक निर्जनस्थळी घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. यानंतर मुलगी गरोदर राहिली. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली होती. तेव्हापासून गेले आठ वर्षे 11 महिने आरोपी येरवडा कारागृहात आहे. (Pune Crime Court News)

या खटल्यात सरकार पक्षाकडून अॅड. लीना पाठक (Adv Leena Pathak) यांनी बाजू मांडली.
सरकार पक्षाकडून नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती.
पीडित मुलीने न्यायालयात खाणाखुणांनी साक्ष दिली. कॅमेऱ्याद्वारे मुलीची साक्ष नोंदवून घेण्यात आली.
साक्ष, तसेच वैद्यकीय पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
शिक्रापूर पोलीस ठाण्याचे तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे (API Hemchandra Khopde)
यांनी याप्रकरणाचा तपास केला.
न्यायालयीन कामकाजात पोलीस हवालदार विद्याधर निचित, एस. बी. भागवत, ज्ञानदेव सोनवणे यांनी सहाय्य केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe On Ajit Pawar | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा, आढळरावांनाही दिले आव्हान, ”स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं करणारा…”

Yerawada Pune Crime News | पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Rupali Chakankar | रूपाली चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा, काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षांची मागणी