Yerawada Pune Crime News | पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुणे : Yerawada Pune Crime News | पतीचे बाहेरील महिलांसोबत असलेले अनैतिक संबंध (Immoral Relationship) आणि त्याच्याकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या (Suicide Case) केली. हा प्रकार येरवडा येथील नागपुर चाळीत मंगळवारी (दि.7) सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. मोनीका मधुकर ओव्हाळ (वय-38) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

याबाबत प्रशांत सुरेश चाबुकस्वार (वय-31 रा. नागपुर चाळ, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मधुकर लक्ष्मण ओव्हाळ (वय-45 रा. नागपुर चाळ) याच्यावर आयपीसी 306 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मधुकर याचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध होते. आरोपी फिर्य़ादी यांच्या बहिणीला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत होता. पतीच्या त्रासाला वैतागून फिर्यादी यांच्या बहिणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Yerawada Pune Crime News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol | दोन लाख पुणेकरांनी घेतल्या ‘व्होटिंग स्लिप’; मोहोळ यांच्या प्रभावी यंत्रणेचा नागरिकांना फायदा

Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांनी दिले चोख प्रत्युत्तर, ”शरद पवार मुद्दाम आजारी पडले, हा अजितदादांचा विचार हास्यास्पद”

Solapur Lok Sabha | धक्कादायक! सोलापुरात मतदाराने पेट्रोल टाकून जाळली EVM मशीन, घटनेनंतर बंदोबस्त वाढवला (Video)

Murlidhar Mohol | झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर – मुरलीधर मोहोळ