Pune Crime Court | पुणे : पोक्सो गुन्ह्यातील आरोपीची सहा वर्षानंतर निर्दोष मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Court | पोक्सो तसेच 376 अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधि. पुणे जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे (Judge SP Ponkshe) यांनी हे आदेश दिले आहेत. आरोपीची पाच ते सहा वर्षानंतर येरवडा कारागृहातून (Yerawada Jail) सुटका झाली आहे अशी माहिती ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर (Adv. Jitendra Ashok Janapurkar) यांनी दिली. अशोक छगन राजपूत Ashok Chhagan Rajput (रा- आलेगाव पागा, ता. शिरूर जि. पुणे. मूळ रा- वाडी, वैजापूर रोड, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजी नगर) असे निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्ह्यातील आरोपी याने पीडित मुलगी तिचे आई-वडील ऊस तोडणी साठी शेतात गेले असता कुणी नसल्याचा फायदा घेऊन
मुलीचे कपडे काढून तिच्यावर अतिप्रसंग केला.
तसेच तिला कोणास काही सांगू नको असे सांगून पैसे दिल्या प्रकरणी अशोक राजपूत याच्यावर शिरुर पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
या गुन्ह्यातील आरोपी अशोक राजपूत याची गुन्ह्यातून सबळ पुरावा नसल्याने निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.(Pune Crime Court)

काय आहे प्रकरण?

फिर्यादी या पीडिताच्या आई असून त्यांनी दिनांक 17 सप्टेंबर 2018 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी या घटनेच्या दिवशी
सकाळी ऊस तोडण्यासाठी कामावर गेले होते.
त्यावेळी त्यांच्या मुलीचा फोन आला आणि तिने सांगितले की, मी व माझी मैत्रीण खेळत असताना, आपल्या ऊस तोडी टोळीतील कामगार अशोक राजपूत आला.
तो आम्हाला म्हणाला मला तुम्हाला मन भरून पाहू द्या, त्यानंतर फिर्यादी व ऊसतोड कामगार त्या ठिकाणी गेले असता आरोपी तेथून पळून गेला होता.
नंतर मुलीने आणखी सांगितले की, या आधीपण बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 10 सप्टेंबर 2018 रोजी आरोपीने आम्हाला आपण चोर पोलीस खेळ खेळू असे म्हणून माझ्यावर अतिप्रसंग केला.
त्यावेळीही आरोपी तेथून पळून गेला. याप्रकरणी आरोपीवर आयपीसी 376, 354, 354(अ), 354(ब) आणि बालकांचे लैंगिक
अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 (पोक्सो) अन्वये कलम 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

या केसमध्ये सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले, त्याचप्रमाणे आरोपीतर्फे ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर
यांनी साक्षीदारांची उलट तपासणी घेऊन अंतिम युक्तिवाद केला.
आरोपी विरुद्ध सबळ पुरावा नसल्या अभावी आरोपी याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
आरोपीतर्फे ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी ही केस चालवली.
तसेच ॲड. आनंद चव्हाण (Adv Anand Chavan), ॲड. मयूर चौधरी (Adv Mayur Chaudhary), ॲड. राजा पारधे (Adv Raja Pardhe) यांनी मदत केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Personnel Died In Accident | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांचा मृत्यू

Amol Kolhe | मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही – डॉ. अमोल कोल्हे