Pune Crime Court | पुणे : पतीच्या खुनाच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Court | काहीही काम धंदा न करता दारु पिऊन चारित्र्यावर संशय घेऊन अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पतीचा दोरीने गळा आवळून खून करुन आत्महत्येचा बनाव करणाऱ्या महिला आरोपीची सबळ पुरावा नसल्याने निर्दोष मुक्तता करण्यात आली (Pune Murder Case). याबाबतचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. मरे (Judge AN Mare) यांनी दिले आहेत. अशी माहिती ॲड. जितेंद्र जानापुरकर (Adv. Jitendra Janapurkar) यांनी दिली. नंदिनी रमेश भिसे (रा- लांडगे निवास, उत्तम नगर, पुणे. मूळ रा- अनदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव) असे निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.(Pune Crime Court)

सहायक पोलीस निरीक्षक पी. एम. वाघमारे (API PM Waghmare) यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी नंदिनी भिसे हिचा पती काही कामधंदा न करता दारू पिऊन चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार पैशाची मागणी करत होता. माहेरच्या नातेवाईकां समक्ष अपमानास्पद वागणूक देतो या कारणावरून आरोपी हिने तिच्या पतीचा दोरीने गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पती रमेश भिसे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करुन पोलिसांना खोटी खबर दिली. यावरुन आरोपीवर भादवी कलम 302, 201, 182 अन्वये उत्तम नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी नंदिनी भिसे हिची या गुन्ह्यातून सबळ पुरावा नसल्याने निर्दोष मुक्तता करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

4 एप्रिल 22 रोजी इंदिरानगर उत्तम नगर (Indiranagar Uttam Nagar) पुणे येथे नंदिनी भिसे यांचे बहिणीच्या मुलाचे विवाहाचे सत्यनारायण पूजा होती. रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास रमेश भिसे हे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले. त्यावेळी नंदिनी भिसे यांनी त्यांना जेवणाची विनंती केली. परंतु रमेश भिसे यांनी जेवणास नकार दिला. तेव्हा नंदिनी भिसे यांनी त्यांना जेवणाचा डबा भरून दिला व रमेश भिसे हे त्यांच्या राहत्या घरी गेले. 5 एप्रिल 2022 रोजी रात्री साडे बाराच्या सुमारास नंदिनी ह्या त्यांच्या निवासस्थानी घरी आल्या. त्यावेळी रमेश भिसे यांनी तू मला आता स्वयंपाक करून जेवू घाल, तू दिलेला डबा खाणार नाही असे म्हणाले. त्यावरून दोघांमध्ये शिवीगाळ व मारहाण झाली होती.

रात्री एकच्या सुमारास नंदिनी यांच्या भावाचा मुलगा अरुण कांबळे व मुलगा अक्षय कांबळे हे घरी झोपण्यास आले. त्यामुळे नंदिनी व रमेश यांनी त्यांच्यासमोर कोणताही वाद न करता किचनमध्ये झोपी गेले व दोन्ही मुले हॉलमध्ये झोपली. मुले व पती झोपले आहेत याची खात्री करून नंदिनी भिसे यांनी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास राहते घरातील नायलॉनच्या दोरीने पतीचा गळा आवळून त्याचा खून केला. मुले झोपले आहेत याची खात्री करून काही वेळाने किचन कट्ट्यावर चढून त्यांनी नायलॉन दोरी किचनच्या छताचे लोखंडी हुकला बांधून त्या दोरीने खालील बाजूस फास करून तो रमेश भिसे यांच्या मृतदेहाच्या गळ्यात अडकला व मृतदेहास उठवून त्याच गुडघ्यावर बसवून रमेश भिसे यांनी स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे असा बनाव केला होता.

पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हॉलमध्ये झोपलेल्या अक्षय व अरुण कांबळे यांना झोपेतून उठून मी झोपेत असताना
पती रमेश भिसे यांनी गळफास घेतला आहे, असे खोटे सांगितले.
सर्व नातेवाईकांना रमेश भिसे याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असे कळवून त्या सकाळी साडे सहाच्या सुमारास
उत्तम नगर पोलीस ठाणे येथे आल्या व त्यांनी सांगितले की रमेश भिसे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या केस मध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. त्याचप्रमाणे आरोपीतर्फे ॲड. विपुल दुशिंग
(Adv Vipul Dushing) आणि ॲड. जितेंद्र जानापुरकर यांनी केस चालवली. ॲड. जितेंद्र जानापुरकर यांनी
ॲड. विपुल दुशिंग यांच्या मार्गदर्शनानुसार उलट तपासणी घेतली. त्याचप्रमाणे ॲड. विपुल दुशिंग यांनी अंतिम युक्तवाद
करून केस सुटावी या उद्देशाने अनेक केस लॉ कोर्टात दाखल केले. सर्व बाबी लक्षात घेता आरोपी विरुद्ध सबळ पुरावा
नसल्याचा अभावी न्यायालयाने आरोपीची निर्दोश मुक्तता केली.
तसेच या केस मध्ये ॲड. आनंद चव्हाण (Adv Anand Chavan), ॲड. मयूर चौधरी (Adv Mayur Chaudhary),
ॲड. सुरज शिंदे (Adv Suraj Shinde), ॲड. अतुल गोणते (Adv Atul Gonte), ॲड. रितेश गदादे (Adv Ritesh Gadade)
यांनी मदत केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Personnel Died In Accident | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांचा मृत्यू