Pune Crime | संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणार्‍या कात्रज परिसरातील टोळीवर ‘मोक्का’, CP अमिताभ गुप्ता यांची आजपर्यंतची 73 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कात्रज (Katraj) आणि भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth) परिसरात संघटिक गुन्हेगारी (Organised Crime) करून दहशत निर्माण करणार्‍या दयानंद उर्फ बापु भिमराव सितापराव Dayanand alias Bapu Bhimrao Sitaprao (30, रा. निंबाळकरवस्ती, गुजरवाडी, निंबाळकरवाडी, कात्रज) याच्या टोळीविरूध्द पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मोक्का MCOCA (Mokka Action) अंतर्गत कारवाई केली आहे. सन 2022 मधील ही 10 वी कारवाई असून आयुक्तांनी आतापर्यंत गुन्हेगारी टोळ्यांवर 73 मोक्क्याच्या कारवाया केल्या आहेत. (Pune Crime)

 

दयानंद उर्फ बापु भिमराव सितापराव याच्यासह सुमित उर्फ कुंदन भिमराव सितापराव Sumit alias Kundan Bhimrao Sitaprao (24) आणि विकास अनिल जाधव Vikas Anil Jadhav (27, रा. खोपडे नगर, गुजरवाडी रोड, कात्रज) यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपींविरूध्द भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये (Bharti Vidyapeeth Police Station) खुन, खुनाचा प्रयत्न, अपहरण, जबरी दुखापत करून दरोडा, दरोडा, दंगा, गंभीर दुखापत, मारामारी करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी संघटितपणे दहशत निर्माण करून स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी गुन्हे केल्याचे दिसून आले आहेत. त्यामुळे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Police Inspector Jagannath Kalaskar) यांनी उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil) यांच्या मार्फत अप्पर आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांच्याकडे मोक्काचा प्रस्ताव पाठविला होता.

प्रस्तावाची छाननी करण्यात आली. त्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी तिन्ही आरोपींविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. मोक्क्याचा पुढील तपास सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan) करीत आहेत. दरम्यान, वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगिता यादव (Police Inspector Sangita Yadhav) आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक (Police Inspector Vijay Puranik) यांनी प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आतापर्यंत 73 टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली असून सन 2022 मधील ही 10 वी कारवाई आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | CP Amitabh Guptas 73rd action of MCOCA Mokka Till Date

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा