Paracetamol, Azithromyci Prices Increase | पॅरासिटामॉलसह सुमारे 800 अत्यावश्यक औषधे महागणार, 1 एप्रिलपासून किमतीत 10 % वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Paracetamol, Azithromyci Prices Increase | आरोग्य चांगले (Good Health) ठेवण्यासाठी औषधांची (Medicine) गरज असते. विशेषत: प्रत्येकाला अत्यावश्यक औषधांची गरज असते. अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढू नयेत, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. पण 1 एप्रिलपासून जवळपास 800 अत्यावश्यक औषधांमध्ये 10 टक्के वाढ (Paracetamol, Azithromyci Prices Increase) करण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) हिरवा कंदील दाखवला आहे. म्हणजेच आगामी काळात या औषधांसाठी सर्वांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे (Drugs Prices increase by 10 percent).

 

किंमती सुमारे 10 टक्क्यांची वाढ
हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure), ताप (Fever), हृदयविकार (Heart Disease), त्वचारोग (Vitiligo) यांच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या आवश्यक औषधांना महागाईचा फटका बसणार आहे. एप्रिलपासून वेदना कमी करणारी औषधे आणि अँटीबायोटिक फेनिटोइन सोडियम, मेट्रोनिडाझोल यांसारख्या अत्यावश्यक औषधांवरही याचा परिणाम होणार आहे.

केंद्र सरकारने शेड्यूल ड्रगच्या किमती वाढवण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. National Pharmaceutical Pricing Authority (NPPA) म्हणते की या औषधांच्या किमती घाऊक महागाई दराच्या Wholesale Price Index (WPI) आधारावर केल्या गेल्या आहेत. कोरोना महामारीनंतर औषध उद्योग सातत्याने औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी करत होता. (Paracetamol, Azithromyci Prices Increase)

फार्मा उद्योगाची होती मागणी
NPPA ने शेड्यूल ड्रग्सच्या किमतीत 10.7 टक्के वाढ करण्यास हिरवा झेंडा दाखवला आहे.
शेड्यूल ड्रग्जमध्ये अत्यावश्यक औषधांचा समावेश असतो आणि त्यांच्या किमती नियंत्रित असतात.

परवानगीशिवाय त्यांच्या किमती वाढवता येत नाहीत.
ज्या औषधांच्या किमती वाढणार आहेत त्यात कोरोनाची मध्यम ते गंभीर लक्षणांवर रुग्णांच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या औषणांचा समावेश आहे.

 

Web Title :- Paracetamol, Azithromyci Prices Increase | about 800 medicines including paracetamol will be expensive 10 percent increase in prices from april

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा