Pune Crime | व्यापार्‍याला लुटण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : Pune Crime | रात्रीच्या वेळी कॅश घेऊन जाणार्‍या व्यापार्‍याला वाटेत गाठून त्याला लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट १ च्या पथकाने जेरबंद केले आहे. (Pune Crime)

आमान समीर शेख (वय २२), अमीर समीर शेख (वय २०), अमोल अनिल अंबवने (वय २०, तिघे रा. काशेवाडी, भवानी पेठ), शाहरुख दाऊद सय्यद (वय २६, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), सादीक अमीर शेख (वय २५, रा. काशेवाडी, भवानी पेठ) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस हवालदार अजय ज्ञानराज थोरात यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २९२/२२)
दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पथक २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी
भवानी पेठेत गस्त घालत होते. त्यावेळी शंकरशेठ रोडकडे जाणार्‍या रस्त्यावर काही जण हत्यारासह जमले असल्याची
माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन पाच जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून कोयत्यासह दरोड्याची साधने जप्त केली आहे़ त्यांच्याकडे चौकशी केल्यावर दुकाने बंद करुन कॅश घेऊन
जाणार्‍या एका व्यापार्‍याकडील रोकड लुटण्यासाठी ते तयारीत होते, असे त्यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Criminals who were preparing to rob a merchant were arrested by the crime branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | नियोजित पत्नीला भेटायला आलेल्या तरुणाचे अपहरण करुन केली बेदम मारहाण; सिंहगड रोड पोलीस ठाण्यात FIR

Devendra Fadnavis | पीएफआयवर बंदी घालणार; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सूचना

CM Eknath Shinde | ‘मिशन’ सोपे नव्हते, फडणवीसांना प्रत्यक्ष भेटायचो, दूरध्वनीवरून बोलणे शक्यच नव्हते, कारण आमचे दूरध्वनी टॅप…, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या आठवणी