Pune Crime | CRPF जवानाची वायरलेसच्या स्टोअररूममध्ये आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | CRPF च्या वायरलेस विभागात कार्यरत 30 वर्षीय जवानाने वायरलेसच्या स्टोअररूममध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री तळेगाव येथे घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. (Pune Crime)

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरेश कुमार गिरी असे मृत जवानाचे नाव आहे. ते मुळचे उत्तरप्रदेश येथील मिर्झापूरचे रहिवासी होते. काही दिवसांची सुट्टी घेऊन ते नुकतेच ड्यूटीवर हजर झाले होते. ते तळेगाव येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये राहत होते. वायरलेस विभागात त्यांची ड्यूटी होती. मंगळवारी रात्री त्यांनी अधिकार्यांशी गप्पा मारल्या. त्यानंतर ते वायरलेसच्या स्टोअर रूममध्ये गेले आणि तेथे केबलच्या सहाय्याने फाशी घेऊन आत्महत्या केली. (Pune Crime)

ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ माजली. गिरी यांनी आपले आयुष्य का संपवले हे अद्याप समजू शकले नाही.
त्यांचा मृतदेह त्यांच्या मुळगावी पाठविण्यात आला आहे. घटनेचा तपास सुरू आहे.

Web Title :- Pune Crime | crpf jawan committed suicide by hanging himself in talegaon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shinde Fadnavis Govt – Shivsena Uddhav Thackeray | शिंदे-फडणवीस सरकारची खेळी आणि महापालिका प्रशासनाची चालढकल, अखेर शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा मोठा निर्णय

Face Glow | रात्री झोपण्यापूर्वी चेहर्‍यावर लावा ही वस्तू, मुरुम-फुटकुळ्या होतील दूर; चेहर्‍यावर येईल ‘नॅचरल ग्लो’

Benifits Of Drinking Coffee | ‘कॉफी लव्हर्स’साठी आली अशी खुशखबर; जाणून व्हाल खुश!