Pune Crime | सायबर चोरट्यांनी Lombard जनरल इन्शुरन्स कंपनीला केले ‘टार्गेट’; कंपनीतून बोलत असल्याचे सांगून देशभरात अनेकांची केली फसवणूक

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | लम्बोर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीला (lombard general insurance) सायबर चोरट्यांनी लक्ष्य केले असून कंपनीच्या ग्राहकांचा डाटा चोरुन पॉलिसी विभागामधून बोलत असल्याचे सांगून फसवणूक (Pune Crime) करण्याचे प्रकार देशभरात उघडकीस आले आहेत. याप्रकरणी लम्बोर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचे तपास अधिकारी विशाल काटकर (वय ५०, रा. बंडगार्डन) यांनी सायबर पोलिसांकडे (Cyber Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार १५ जुलैपासून आतापर्यंत घडला आहे.

सायबर चोरट्याने कंपनीतील ग्राहकांचा डाटा चोरला. त्यानंतर त्यांच्या पॉलिसीचे नुतनीकरण करायचे आहे, अशा ग्राहकांना त्यांनी कंपनीच्या नावाने बनावट ई मेल पाठविला. तसेच या पॉलिसी ग्राहकांना कंपनीच्या पॉलिसी विभागामधून बोलत असल्याचे सांगून पॉलिसी या वेगवेगळ्या प्रॉडक्टसाठी दिल्या जातात. त्यामध्ये वाहन विमा, प्रॉपर्टी विमा, फायर विमा, आरोग्य विमा अशा वेगवेगळ्या पॉलिसीचे नुतनीकरण करुन दिले जातात, असे ग्राहकांना सांगून त्यांना पेमेंट करण्यासाठी एचडीएफसी बँकेचा खाते क्रमांक दिला. ग्राहकांनी त्यावर पैसे भरले. परंतु, त्यांच्या पॉलिसीचे नुतनीकरण झाले नाही. त्यामुळे ग्राहकांनी कंपनीकडे तक्रारी केल्या. त्यानंतर कंपनीने केलेल्या तपासात अशा प्रकारे कंपनीचा डाटा चोरुन ग्राहकांची व कंपनीची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पुणे शहरासह देशातील आणखी काही ठिकाणी अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे. सायबर पोलीस ठाण्याचे (Cyber Police Station) पोलीस निरीक्षक चिंतामण अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Cyber ​​thieves ‘target’ Lombard General Insurance Company; He cheated many people across the country by saying that he was speaking from the company

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Taliban | तालिबानचा मोठा निर्णय, भारताला धक्का देत आयात-निर्यातीवर घातली बंदी

UIDAI ने जारी केला विशेष अलर्ट! तुमचे Aadhaar Card बनावट तर नाही ना? ‘ही’ आहे चेक करण्याची पद्धत

Bhosari Plot Scam Case | भोसरी भूखंड घोटाळा प्रकरण; मंदाकिनी खडसे ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर