Pune Crime | दत्तजयंतीत धक्का लागल्याने टोळक्याचा राडा, 7 जणांवर FIR; कोथरूड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दत्तजयंतीनिमित्त (Dutt Jayanti) लावण्यात आलेल्या डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून सात जणांनी हवेत कोयते फिरवून दहशत निर्माण केली. हा प्रकार कोथरूड येथील गोसावी वस्तीमध्ये मंगळवारी (दि.6) रात्री साडेनऊच्या सुमारास दत्त मंदिराजवळ घडला. याप्रकरणी (Pune Crime) सात जणांवर गुन्हा (FIR) दाखल करून एकाला अटक (Arrest) केली आहे.

किरण रमेश गायकवाड, गोपाल राजेश सपोनिशी (वय 19), अमोल कोंडीबा उफाडे (वय 19), आदित्य गणेश शिंदे उर्फ जॉन्टी (वय 21), विजय मुन्नाकुमार दास (वय 19), आदित्य भोसरे, गौरव निंबाळकर यांच्यावर आयपीसी 143, 147, 148, 149, 427, 504, 506, आर्म अ‍ॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल करून गौरव निंबाळकर याला अटक केली आहे. याबाबत अक्षय शंकर सोनार (वय 23, रा. हॅपी कॉलनी, कोथरूड) याने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) बुधवारी (दि.7) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वस्तीमध्ये दत्तजयंती कार्यक्रमानिमित्त डीजे साउंड सिस्टिम
(DJ Sound System) लावण्यात आली होती. त्यावेळी नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून आरोपींनी
दत्त मंदिराजवळ गोंधळ घातला. किरण गायकवाड याला का मारले असे म्हणत हातातील कोयते हवेत फिरवून
हिंमत असेल तर समोर या एकेकाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत दहशत माजवली. तसेच दत्त मंदिराजवळ प्रशांत सुर्वे यांनी पार्क केलेल्या गाडीवर कोयते मारून गाडीची तोडफोड केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण (PSI Chavan) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Dutt Jayanthi riots, FIR against 7 people; Incidents in Kothrud area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr. Amol Kolhe | संसदेत डॉ. अमोल कोल्हेंचा माईक बंद

CM Eknath Shinde | गुजरात विधानसभेच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया