×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांना धमकावुन खंडणी मागणार्‍याने तरुणीचे...

Pune Crime | माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांना धमकावुन खंडणी मागणार्‍याने तरुणीचे अश्लिल फोटो व्हायरल करुन केली बदनामी

पुणे : Pune Crime | माजी नगरसेवक दीपक मिसाळ (Deepak Misal) यांच्या मोबाईलवर मेसेज करुन खंडणी (Ransom) मागणार्‍याने एका तरुणीचा बायोडाटावरुन फोटो मार्फ करुन तिचे अश्लिल फोटो (Obscene Photo) बनवून ते व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

इम्रान समीर शेख Imran Sameer Sheikh (वय ३७, रा. घोरपडी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी खराडीतील एका २३ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३५२/२२) दिली आहे. हा प्रकार २३ सप्टेबर २०२२ ला घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान शेख याने पुणे मॅरेज ग्रुपवरुन (Pune Marriage Group) फिर्यादी यांचा बायोडाटा (Biodata) घेतला. फिर्यादीचे अश्लिल फोटो व मेसेज फिर्यादीचा भाऊ व चुलत भाऊ यांचे मोबाईलवर व नातेवाईकांना व्हॉटसअ‍ॅपवर (WhatsApp Message) पाठविले. फेसबुक अकाऊंट (Facebook Account) तयार करुन त्यावर फोटो व्हायरल करणार आहे. तसेच मॅरेज सर्टिफिकेट निकालनामा व्हायरल करणार आहे. मी तुला उचलून नेणार आहे, असे धमकीचे मेसेज व्हाटसअ‍ॅपवर केले आहेत. त्यामुळे या तरुणीने बदनामी केल्याची तक्रार पोलिसांकडे (Pune Police) केली असून पोलीस निरीक्षक कदम (Police Inspector Kadam) अधिक तपास करीत आहेत. (Pune Crime)

माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांचा मोबाईल तसेच त्यांची भावजय आमदार माधुरी मिसाळ
(MLA Madhuri Misal) यांचा जनसंर्पकासाठी असलेल्या संपर्क क्रमांक याच्यावर आरोपीने मेसेज केले.
त्याने कधी २ लाख कधी ३ लाख तर कधी ५ लाख रुपयांची खंडणी मागणारे मेसेज केले.
सुरुवातीला त्यांनी अशा मेसेजकडे दुर्लक्ष केले.
त्यानंतर या व्यातिरिक्त आणखी एका मोबाईल क्रमांकावर त्याने पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी
(Threat) दिली.
त्यानंतर दीपक मिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता.
त्यानंतर पोलिसांनी भा. द. वि. ३८६ आणि आय टी अ‍ॅक्ट कलम ६६ सी नुसार गुन्हा दाखल केला आहे.
बिबवेवाडी पोलिसांनी (Bibwewadi Police) इम्रान शेख याला अटक (Arrest) केली आहे.
सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर या तरुणीने पुढे येऊन आता तक्रार दिली आहे.

Web Title :- Pune Crime | Ex-corporator Deepak Misal was defamed by the extortionist who threatened him by spreading obscene photos of the girl.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, 755 कोटींची मदत जाहीर

Abdul Sattar | अब्दुल सत्तार यांचा उद्धव ठाकरे यांना टोला, शिंदेंचे नेतृत्व माना…अन्यथा तुमची शिवसेना…

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News