Abdul Sattar | अब्दुल सत्तार यांचा उद्धव ठाकरे यांना टोला, शिंदेंचे नेतृत्व माना…अन्यथा तुमची शिवसेना…

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाचे (Shinde Group) मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे सातत्याने शिवसेना (Shivsena) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य करत आहेत. सत्तार यांनी आज पुन्हा एकदा जालन्यात हिंदूगर्वगर्जना मेळाव्यात बोलताना म्हटले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे नेतृत्व मानावे आणि जुळवून घ्यावे. जुळवून घेतले नाही तर उद्धव ठाकरेंची शिवसेना दुर्बिणीने बघावी लागेल. (Abdul Sattar)

 

2014 मध्ये भाजपासोबतची (BJP) युती तोडून काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीसोबत (NCP) सत्ता स्थापनेचा प्रस्ताव शिवसेनेने दिला होता. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे वरिष्ठ नेते मला माझ्या कार्यालयात येऊन भेटले होते, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, मी स्वत: त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. अशोक चव्हाणांसोबत आम्हीच एकनाथ शिंदेंकडे सत्ता स्थापनेची विनंती घेवून गेलो होतो.

 

दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut), चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यासह शिवसेना नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर एकनाथ शिंदे 15 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते, असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. दरम्यान, भाजपाने हा उद्धव ठाकरे यांचा डाव असल्याचा दावा केला आहे.

अशोक चव्हाण यांच्या गौप्यस्फोटावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी म्हटले की, हा कट मातोश्रीवर शिजला असेल.
उद्धव ठाकरेंनीच तसे ठरवले असेल आणि एकनाथ शिंदे निरोप घेऊन गेले असतील.
राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार असताना एकनाथ शिंदे हे नेते नव्हते.
तेव्हा नेते उद्धव ठाकरेच होते. त्यामुळे भाजपसोबत दगाबजीचा तो निर्णय उद्धव ठाकरे यांचाच असेल.

 

Web Title :- Abdul Sattar | minister abdul sattar has said that
formercm uddhav thackeray should accept the leadership of cm eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा