Pune Crime | FDA ची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई ! कोंढवा बुद्रुक येथील पनीर कारखान्यावर छापा; 22 लाखाचा साठा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) कार्यालयाने सोमवारी (दि.12) वानवडी (Vanavadi) येथील बनावट पनीर (Fake Cheese) तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून 800 किलो बनावट पनीर जप्त केले होते. त्यानंतर आज (मंगळवार) कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर परिसरातील मे.सद्गुरू कृपा मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स (Sadguru Kripa Milk and Milk Products Kondhwa Budruk) या कारखान्यावर कारवाई करून 22 लाख 65 हजार रुपये किंमतीचा बनावट पनीर, स्किम्ड मिल्क पावडर, पामेलिन तेल आदी साठा जप्त केला. 5 सप्टेंबर पासून नकली पनीर बनवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई (Pune Crime) करण्यात येत असून आत्तापर्यंत तीन कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे.

कारखान्यावर छापा (Raid) टाकला असता अस्वच्छ परिस्थितीत दूध पावडर आणि पामोलिन तेलाचा (Palmoline Oil) वापर करुन बनवलेले बनावट पनीर तसेच स्किम्ड मिल्क पावडर (Skimmed Milk Powder) व पामोलिन तेल साठविल्याचे आढळले. साठ्यातून तपासणीसाठी नमुने घेत किंमत 2 लाख 39 हजार 800 रूपये किंमतीचे 1 हजार 199 किलो पनीर, 18 लाख 71 हजार 652 रूपये किंमतीचे 4 हजार 73 किलो स्किम्ड मिल्क पावडर, 1 लाख 53 हजार 675 रूपये किंमतीचे 1 हजार 48 किलो आरबीडी पामोलीन तेल असा एकूण 22 लाख 65 हजार 217 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. (Pune Crime)

पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. घेतलेले नमुने प्रयोगशाळेकडे
तपासणीसाठी पाठविले असून अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई (Legal Action) करण्यात येईल.
अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) आणि आयुक्त परिमलसिंह
(FDA Commissioner Parimal Singh) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कार्यालयातील
सहायक आयुक्त रुपाली खामणे (Assistant Commissioner Rupali Khamane),
अन्न सुरक्षा अधिकारी सुप्रिया जगपात (Supriya Jagpat) व सोपान इंगळे (Sopan Ingle) यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे.
अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे (Joint Commissioner Sanjay Naragude) यांनी केले आहे.

Web Title :- Pune Crime | FDA Action on paneer factory at Kondhwa Budruk

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | जप्त मालमत्तेचा बँक मॅनेजरनेच केला अडीच कोटींचा अपहार; लोणीकंद पोलीस ठाण्यात FIR

RBI ने रद्द केले पुण्यातील ‘या’ बँकेचे लायसन्स, तुमचे सुद्धा असेल खाते; तर काढू शकणार नाही पैसे

Employee Pension Scheme | पेन्शनसाठी पीएफ अकाऊंटमध्ये केव्हापर्यंत करावे लागेल योगदान? जाणून घ्या फायद्याची बाब