Pune Crime | शौचालयाच्या टाकीत गुदमरुन चौघांचा मृत्यु; घरमालक भीमाजी काळभोरविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कदमवाक वस्ती (Kadam Wasti) येथील एका इमारतीच्या शौचालयाची टाकी (Toilet Tank) साफ करताना पडल्यानंतर ४ जणांचा गुदमरुन मृत्यु झाला (4 Die Of Suffocation While Cleaning Septic Tank) . मृत्यु झालेल्यांमध्ये टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा, तर त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या एका नागरिकाचा समावेश आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) घरमालकाविरुद्ध गुन्हा (FIR On House Owner) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

भीमाजी जयसिंग काळभोर Bhimaji Jaysingh Kalbhor (रा. सिद्राम मळा, लोणी काळभोर) असे या घरमालकाचे नाव आहे. या दुर्घटनेत पदमाकर मारुती वाघमारे (वय ४३, रा. पठारे वस्ती), रुपचंद नवनाथ कांबळे (वय ४५, रा. कदमवाक वस्ती), कृष्णा दत्ता जाधव (वय २६, रा. देशमुख वस्ती, देगाव, ता. उत्तर सोलापूर, सोलापूर), सिकंदर ऊर्फ दादा पोपट कसबे (वय ४५, रा. कदमवाक वस्ती) यांचा मृत्यु झाला आहे. ही दुर्घटना कदमवाक वस्ती येथील प्यासा हॉटेलच्या मागे राजेंद्र जयसिंग काळभोर यांच्या मालकीच्या जय मल्हार कृपा नावाच्या इमारतीच्या शौचालयाच्या टाकीत बुधवारी सकाळी साडेदहा वाजता घडली होती. (Pune Crime)

 

याप्रकरणी राजनंदीनी पदमाकर वाघमारे (वय २६, रा. पठारे वस्ती, कदमवाक वस्ती) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे.

रुपेश कांबळे व सिकंदर कसबे यांनी ही शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम घेतले होते.
साफसफाईचे काम सुरु असताना कृष्णा जाधव हा पाइप सरकवत असताना तोल जाऊन शौचालयाच्या टाकीत पडला.
त्याला वाचविण्यासाठी टाकीच्या तोंडावर आलेला दादा कसबे पडला.
दोघे जण टाकीत पडल्याचे लक्षात येताच रुपेश कांबळे याने टाकीत उडी घेतली.
मात्र, बराच वेळ झाला तरी तो टाकीतून बाहेर येत नसल्याचे पाहून शेजारच्या खोलीत राहणारे भाडेकरु पदमाकर वाघमारे यांनीही टाकीच्या तोंडाकडे धाव घेतली. मात्र, तेही पाय घसरुन टाकीत पडले. टाकीत मोठ्या प्रमाणात घाण व गॅस असल्याने चौघांचाही मृत्यु झाला.

 

इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ करताना कोणतेही सुरक्षेची साधने किंवा ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करुन न देता,
तसेच त्या कामामध्ये निष्णात असणार्‍या कामगारांकडून काम करुन घेणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करुन या कामगारांना काम करण्यास भाग पाडले.
तसेच फिर्यादीचे पतीचा काहीही संबंध नसताना त्यांनाही जबरदस्तीने मैला पाण्याच्या टाकीमध्ये उतरण्यास भाग पाडून फिर्यादीच्या पती व इतर ३ कामगारांच्या मृत्युस जबाबदार झाल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक शेंडगे तपास करीत आहेत़.

 

Web Title :- Pune Crime | Four die of suffocation in Septic Tank case against house owner Bhimaji Kalbhor in loni kalbhor police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा