Pune Crime | दुर्दैवी ! शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुणांचा मृत्यू; पुण्याच्या लोणीकाळभोर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शौचालयाची टाकी (Toilet Tank) साफ (Clean) करताना चार तरुण टाकीत पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू (4 Youths Died) झाला. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) लोणी काळभोर (Loni Kalbhor Pune) परिसरात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Loni Kalbhor Police) आणि पीएमआरडीएच्या (PMRDA) जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

मयत इसम नामे …

१. पद्माकर मारुती वाघमारे वय- ३६ वर्ष धंदा – वॉचमन (एमआयटी कॉलेज) रा. जय मल्हार बिल्डींग पठारेवस्ती कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे
२. सिकंदर उर्फ दादा पोपट कसबे वय -44 वर्ष रा. संभाजीनगर,कदमवाकवस्ती, ता. हवेली जि. पुणे
३. कृष्णा दत्ता जाधव वय- २५ वर्ष रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे मूळ रा. देशमुखवस्ती, देगाव, सोलापुर
४. रूपचंद नवनाथ कांबळे वय- ३५ धंदा : कॉन्ट्रॅक्टर रा. घोरपडेवस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे मूळ रा. केळेवाडी वाशी, उस्मानाबाद अशी आहेत.

असे मृत्यू झालेल्या चौघांची नावे आहेत.

पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील हॉटेल प्यासा (Hotel Pyasa) जवळ असलेल्या परिसरात ही घडली आहे. एका घराची शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी तरुण आले होते. 10 ते 12 फुट खोल असलेल्या टाकीमध्ये सुरुवातील 2 तरुण पडले, त्यानंतर इतर दोन जण टाकीत पडले. टाकीत गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Pune Crime)

 

ही घटना सकाळी 11.15 च्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच केंद्र अधिकारी विजय महाजन (Vijay Mahajan), वाहन चालक माने नितीन, विकास पालवे, अभिजित दराडे,
उमेश फाळके, मुस्तक तडवी, मयूर गोसावी, चेतन खमसे, प्रशांत अडसूळ, ओम पाटील, अक्षय नेवसे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जवानांनी अथक परिश्रम घेऊन चार तरुणांचे मृतदेह टाकीतून बाहेर काढले.

 

Web Title :- Pune Crime | Four youths fell into toilet tank while cleaning all died in loni kalbhor area of pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा