Pune News | युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांच्या सुटकेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून भोलेनाथाला साकडं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) हल्ला (Attack) केल्यानंतर युक्रेनमध्ये अनेक भारतीय नागरिक (Indian citizens) आणि विद्यार्थी (Student) अडकले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो विद्यांर्थ्यांच्या सुटकेसाठी आणि सुखरुप भारतात परत येण्यासाठी आज महाशिवरात्रीच्या (Mahashivaratri) दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिलांनी पुण्यातील (Pune News) खडकी (Khadki) येथील शिवमंदिरात (Shiv Mandir) महामृत्यूंजय मंत्राचा (Mahamrityunjaya Mantra) जाप करण्यात आला. यावेळी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला पदाधिकारी आणि कर्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

 

रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध (War) सुरु झाले असून युक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्यांची सुखरुप सुटका व्हावी तसेच दोन्ही देशांतील युद्ध थांबून त्या ठिकाणी शांतता स्थापित व्हावी यासाठी भोलेनाथ भगवान यांना साकडे घालण्यात आले. यावेळी महिलांसह वायुदल (Air Force), स्थलदल, नौदलाचे (Navy) माजी अधिकारी देखील उपस्थित होते. (Pune News)

 

 

यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगीता तिवारी (Sangeeta Tiwari), राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre),
पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आनंद (Pooja Anand), शोभा पांनिकर, आरती साठे, कांता ढोणे, शुभांगी वखारे, सुंदरा ओव्हाळ, चिमटे, ज्योती परदेशी, सरोज त्रिपाठी, सुनीता नेमुर, शोभा अरुदे, संगीता अवळे, लावण्या शिंदे, मनिषा सानप, लीना नांगरे, आकांशा शिंदे यांच्यासह महिला आणि युवती उपस्थित होत्या.

 

 

Web Title :- Pune News | Russia Ukraine War Congress NCP Pune News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 675 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Jayant Patil | ‘युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये सुटकेबाबत विश्‍वास निर्माण करण्यात कुठेतरी कमी पडलो’, राष्ट्रवादीची केंद्र सरकारवर नाराजी

 

Ramdas Athawale In Pune | महापालिका निवडणुकीत ‘रिपाइं’ला 25 जागा हव्यात; रामदास आठवले म्हणाले – ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वयंभू राजे’