Pune Crime | खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला बिबवेवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खून करुन फरार झालेल्या आरोपीच्या बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi police) मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) बिबवेवाडी येथे करण्यात आली आहे. वाक्य उर्फ प्रसाद संभाजी आयवळे Prasad Sambhaji Ayvale (वय-25 रा. बिबवेवाडी ओटा नं.225 दत्त मंदिरामागे) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खुनाच्या गुन्ह्यात पोलीस आरोपीचा शोध घेत होते.

 

 

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी वाक्या उर्फ प्रसाद आयवळे हा त्याच्या लहान बहिणींना भेटण्यासाठी बिबवेवाडी येथे येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे (API Pravin Kalukhe) यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बिबवेवाडी येथे सापळा रचला. आरोपी पायी चालत येत असताना दबा धरून बसलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. (Pune Crime)

 

 

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे (Senior Police Inspector Sunil Jhaware), पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर (Police Inspector Anita Hivarkar) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस हवालदार लोहमकर पोलीस अंमलदार येवले यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षग अनिता हिवरकर करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Fugitive accused in murder case arrested by Bibvewadi police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mayor Murlidhar Mohol | समाविष्ट गावांच्या विकासासाठी महापालिका कटिबद्ध : महापौर मोहोळ

 

Maharashtra Government Employees | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ! महागाई भत्ता 3 टक्के वाढणार?

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात कोरोनाचा हाहा:कार! गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 46,723 नवे रुग्ण, मृतांचा आकडा वाढला; जाणून घ्या इतर आकडेवारी