Pune Crime | पादचार्‍यांना लुटण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; स्वारगेट परिसरातील घटना

पुणे : Pune Crime | स्वारगेट बसस्टॅन्ड (Swargate Bus Stand) लगतच्या पुलाखाली येणार्‍या जाणार्‍या पादचारी लोकांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखेने (Pune police Crime Branch) अटक (Arrest) केली आहे.

संतोष शरणप्पा जाधव Santosh Sharanappa Jadhav (वय ३८), अमित नाना चव्हाण Amit Nana Chavan (वय २७), विनोद बजरंग गायकवाड Vinod Bajrang Gaikwad (वय ३४, सर्व रा. मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार सचिन अशोक गायकवाड (Sachin Ashok Gaikwad) व विकी कृष्णा मानेक (Vicky Krishna Manek) हे पळून गेले असून हे सर्व जण रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal) आहेत. (Pune Crime)

याबाबत पोलीस हवालदार विनोद चव्हाण (Police Constable Vinod Chavan) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२६/२२) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. स्वारगेट बसस्टॅन्डलगतच्या पुलाखाली बुधवारी रात्री साडेनऊ वाजता हे सर्व जण जमले होते.
पुलाखाली येणारे जाणारे पादचारी लोकांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटण्याच्या तयारीत ते होते.
याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन त्यांना पकडले.
त्यांच्याकडून मिरची पावडरची पुडी, दोन कटर, कोयता व दोन बॅगा, ३ मोबाईल असा ३० हजार रुपयांचा माल जप्त
केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक मोहिते (Assistant Police Inspector Mohite) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Gang ready to rob pedestrians jailed; Incidents in Swargate area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा