Pune Crime | पुण्यात महिला पोलिसांचे केस ओढून केली धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | काशेवाडी (Kashewadi) येथे भांडणे सुरु असताना पोलीस नियंत्रण कक्षाकडून (Pune Police Control Room) आलेल्या कॉलनुसार घटनास्थळी गेलेल्या दामिनी मार्शल (Damini Squad Pune) यांना धक्काबुक्की करुन त्यांचे केस ओढून शिवीगाळ करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police Station) तिघा महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिला पोलीस शिपाई यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १६२/२२) दिली आहे. मनिषा खंडाळे, एकांबरी खंडाळे, ज्योती पवार (सर्व रा. काशेवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशेवाडी येथे भांडणे व मारहाण सुरु असल्याची माहिती दामिनी मार्शल यांना मिळाली. त्यांच्यातील भांडणे सोडवीत असताना मनिषा खंडाळे यांनी फिर्यादी यांची कॉलर पकडली. एकांबरी व ज्योती यांनी फिर्यादी यांच्या सहकारी महिला पोलीस शिपाई यांना जोरात धक्काबुक्की केली. फिर्यादी यांचे केस जोरात ओढून त्यांना शिवीगाळ केली. या महिलांना इतर पोलिसांच्या मदतीने काशेवाडी पोलीस चौकीत आणले असताना त्यांनी पुन्हा ‘‘तुम्ही आम्हाला चौकीत आणणारे कोण’’असे म्हणून शिवीगाळ करुन गोंधळ घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केला, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नाईक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | In Pune a lady police officers hair was pulled and pushed khadak police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा