Pune Crime | चतुःशृंगी पोलिसांकडून आंतरराज्य टोळीला अटक; 9 गुन्हे उघडकीस, 5 लाख 74 हजारांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नदीकाठीलगत असलेल्या सोसायट्यामधील फ्लॅटमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत आंतरराज्य टोळीला चतुःशृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police) अटक केली. त्यांच्याकडून ९ गुन्हे उघडकीस आणून ५ लाख ७४ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. टोळीने ओैंध (Aundh), बाणेर (Baner) परिसरात घरफोडीचा हैदोस माजविला होता. मात्र, पथकाने अतिशय कौशल्याने तपास करीत टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Pune Crime)

 

राकेश इंदू मच्छा (वय २१), सुरेश गुमानसिंग मावी (वय २०), प्यारसिंग भुल्ला अलावा (वय २०), बियानसिंग उर्फ भाया ठाकूरसिंग भुढड (वय २०), महेंद्रसिंग कलमसिंग डावर (वय २०), महिंदर धानसिंग अजनार (वय २०), कल्लू मकून देवका (वय २३, सर्व रा. धार, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

ओैंध, बाणेर परिसरात नदीपात्राजवळ असलेल्या फ्लॅटचे कुलुप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला होता. त्यापाश्र्वभूमीवर चतु:शृंगी पोलिसांचे (Chaturshringi Police Station) तपास पथकातील पोलीस अमलदार प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, तेजस चोपडे, श्रीकांत वाघुले, बाबा दगडे यांनी सलग १५ दिवस पहाटेच्या सुमारास परिसरात पाळत ठेवली होती. त्यानंतर टोळी चोरीच्या प्रयत्नात असताना त्यांना रंगेहाथ पकडले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik), अप्पर आयुक्त नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar), ACP आरती बनसोडे (ACP Arti Bansode), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे (Senior Police Inspector Rajkumar Waghchaure),
पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण (Police Inspector Ankush Chintaman),
तपास पथकाचे उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक, उपनिरीक्षक रुपेश चाळके, उपनिरीक्षक महेश भोसले,
रुपेश टेमगिरे, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, तेजस चोपडे, शेरु वाघवले, बाबा दांगडे, कुणाल माने, सुधीर माने,
किशोर दुशिंग, आशिष निमसे, तेजस चोपडे, सुहास पोतदार, सचिन कांबळे यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Inter-state gang arrested by Chathushringi police; 9 crimes revealed, compensation of 5 lakh 74 thousand seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ईडीला कार्टाने झापले! संजय राऊत मीडियाशी बोलतात, तुमच्या का पोटात दुखतंय?

Rain In Maharashtra | मान्सून ‘या’ तारखेला घेणार निरोप, 6 जिल्ह्यांवर अस्मानी संकट

Pune Crime | न्यायालयाने फटकारल्यानंतर हडपसर पोलिसांनी बलात्कार प्रकरणी दाखल केला गुन्हा