Pune Crime | प्रेयसीला बाथरुममध्ये ठेवले कोंडून, पुण्यातून दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण ! प्रियकरास लातूरहून केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्रेयसीला लॉजमधील (Lodge In Pune) बाथरुममध्ये कोंडून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण (Kidnapping Cases In Pune) करून पळून नेणार्‍या प्रियकराला सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) लातूरमध्ये (Latur) पकडून मुलाची सुखरुप सुटका केली. (Pune Crime)

 

सुनील सोपान पांढरे Sunil Sopan Pandhre (वय २६, रा. पांढरेवाडी, ता. गंगाखेड – Gangakhed, जि. परभणी Parbhani) असे या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी एका २७ वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला आणि पांढरे एकाच कंपनीत काम करीत असल्याने त्यांचा परिचय झाला होता. ते पुणे सातारा रोडवरील (Pune Satara Road) एका लॉजमध्ये १ ते ३ एप्रिलपर्यंत मुक्कामाला होते. दिवसभर दगडुशेठ गणपती (Dagdusheth Ganpati), कात्रज सर्पोद्यान (Katraj Zoo) , स्वामी नारायण मंदिर (Swami Narayan Mandir) येथे फिरुन ते पुन्हा लॉजवर येऊन राहत होते. (Pune Crime)

 

त्यांच्याबरोबर फिर्यादी यांचा दीड वर्षाचा मुलगाही होता. मंगळवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला. तेव्हा पांढरे याने या महिलेला बाथरूममध्ये कोंडले आणि तिच्या मुलाला घेऊन तो पसार झाला. महिलेने आरडाओरडा केल्याने लॉजच्या मॅनेजरने येऊन तिची सुटका केली. तिने तातडीने सहकारनगर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई (Senior Police Inspector Swati Desai)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक समीर शेंडे (API Sameer Shande) यांनी फिर्यादीकडून अधिक माहिती मिळवून त्याचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केले असता पांढरे हा मुळ गावी असल्याचे व सध्या तो लातूरमधील अहमदपूर (Ahmedpur) येथे असल्याची माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक छबु बेरड, अंमलदार भुजंग इंगळे व महेश मंडलिक हे तातडीने अहमदपूरला रवाना झाले.
त्यांनी एका लॉजमधून पांढरे याला ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली.

 

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, निरीक्षक युनुसर मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे,
हवालदार बापू खुटवड, पोलीस अंमलदार भुजंग इंगळे, महेश मंडलिक, भुजंग इंगळे, महादेव नाळे, सुशांत फरांदे, सागर सुतकर,
सागर शिंदे, प्रदीप बेडीस्कर, मंगेश बोराडे यांनी केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Locked up in bathroom kidnapped one and a half year old boy from Pune lover arrested from Latur

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा