Pune Crime | कार्ला परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या ‘अश्लिल’ डान्स पार्टीवर लोणावळा पोलिसांची धाड ! 8 महिलांसह 17 जणांवर FIR, 74 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे / लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) लोणावळा पोलिसांनी (Lonavala police) कार्ला परिसरातील एका बंगल्यावर मोठी कारवाई (Pune Crime) केली आहे. पोलिसांनी बंगल्यात सुरु असलेल्या डान्स पार्टीवर (Dance Party) छापा टाकून 9 पुरुष आणि 8 महिलांवर गुन्हा (FIR) दाखल करुन 74 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी पोलिसांनी दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्ला गावच्या हद्दीमधील एम.टी.डी.सी (M.T.D.C.) जवळ दुर्गा सोसायटीमधील तन्वी बांगल्यात काही लोक स्पीकरवर गाणे लावून त्यावर अश्लिल हावभाव करुन नाचत असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोन पथके तयार करुन दुर्गा सोसायटीमधील (Durga Society) तन्वी बंगल्यावर छापा टाकला.
त्यावेळी 9 पुरुष आणि 8 महिला गाण्यावर नाचत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी 17 जणांना अटक (Arrest) केली.

 

पोलिसांनी ऋषिकेश संजय पठारे, अमित कृष्णा मोरे, योगेश संदेश काशिद, विकास रामचंद्र पारगे, कैलास मारुती पठारे, स्वप्नील जगदीश तापकीर,
विनोद रमेश डख, प्रसाद बाळासाहेब विर, नागेश कुंडलीक थोरवे (सर्व. रा. चऱ्होली) यांच्यासह 8 महिलांवर कारवाई केली आहे.
पोलिसांनी या ठिकाणाहून रोख रक्कम, मोबाईल फोन, 5 चारचाकी वाहने, स्पीकर असा एकूण 74 लाख 27 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल (Pune Crime) जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख (SP Abhinav Deshmukh), अप्पर अधीक्षक मितेश घट्टे (Addl Superintendent of Police Mitesh Ghatte),
उपविभागीय पोलीस अधीकारी राजेंद्र पाटील (Sub-Divisional Police Officer Rajendra Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण मोरे (Police Inspector Pravin More),
पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर (PSI Sachin Bankar), सहायक फौजदार युवराज बनसोडे, पोलीस हवालदार खान, शेख, पवार, कदम, बोराडे, कोहिनकर,
चालक पोलीस नाईक प्रणयकुमार उकिर्डे यांच्या पथकाने (Pune Crime) केली.

 

Web Title : Pune Crime | Lonavala police raid obscene dance party in a bungalow in karla area near lonavala of pune district! FIR against 17 persons including 8 women, property worth Rs 74 lakh seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rachita Ram | कन्नड अभिनेत्री रचिता रामने ‘मधुचंद्रा’च्या रात्री बाबत केलं अत्यंत वादग्रस्त विधान, होतोय जोरदार विरोध

Amravati Violence | अमरावतीमध्ये संचारबंदी लागू, पोलिसांकडून भाजपचा माजी मंत्री स्थानबध्द? (व्हिडीओ)

Habibganj Railway Station | मुंबई, दिल्ली, पुणे आणि बेंगळुरुला सुद्धा हबीबगंज स्टेशनने टाकले मागे, फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नाहीत सुविधा