Pune Crime | आजारी व्यक्तीसाठी दिली ‘मर्सिडीज’ ! नातेवाईकाने केला ‘अपहार’, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरातील आजारी व्यक्तीची ने आण करण्यासाठी मर्सिडीज कार घेऊन जाऊन ती परत न करता तिचा नातेवाईकानेच अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी अस्लम गनीभाई सय्यद (वय ५०, रा. थेऊर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २६८/२२) दिली आहे. त्यावरुन जावेद सत्तार खान (वय ३८, रा. हांडेवाडी रोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०१७ मध्ये घडला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सय्यद यांचा आरोपी जावेद खान हा चुलत आत्याचा मुलगा आहे. त्याने सय्यद यांच्या मालकीची मर्सिडीज कार घरातील आजारी व्यक्तीचे ने आण करण्यासाठी मागितली होती. फिर्यादी यांनी ती विश्वासाने कार दिली. मात्र, त्यानंतर आरोपीने कार परत न करता १० लाख रुपयांची कारचा अपहार केला. अनेकदा मागणी करुनही त्यांनी ती परत न दिल्याने शेवटी सय्यद यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक गोरे तपास करीत आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Loni Kalbhor Police Station Crime News

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा