Chandrapur Accident News | पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; 6 जणांचा होरपळून मृत्यू

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrapur Accident News | चंद्रपूर शहरात भीषण अपघात (Chandrapur Accident News) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर (Petrol Tanker) आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये (Truck) समोरासमोर धडक झाली. त्यानंतर भीषण आग (Fierce Fire) लागली. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून ही आग आणखी भडकली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू (6 killed) झाला आहे. या घटनेमुळे महामार्गावर रात्रभर वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. (Terrible accident in petrol tanker and truck)

चंद्रपूर शहरालगत मूल मार्गावरच्या अजयपूर गावाजवळ ही घटना घडली. अपघातामध्ये आगीच्या उंच ज्वालांनी लगतच्या जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात सापडले आहे. या अपघाताची माहिती समजताच मूल-चंद्रपूर येथून अग्निशमन पथके रवाना करण्यात आली. मूल-रामनगर पोलिसांची (Mool-Ramnagar Police) पथके, अग्निशमन दल (Fire Brigade) घटनास्थळी दाखल झाले आहे. आणि त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू केलं. (Chandrapur Accident News)

दरम्यान, या भीषण अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दोनपैकी एका ट्रकमध्ये लाकूड असल्याची माहिती असून या आगीत चालक-वाहकांचे काय झाले याबाबत अजून माहिती समोर आली नाही. दरम्यान या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलीस तपास करीत आहेत.

Web Title  : Chandrapur Accident News | petrol-tanker and truck collide each other 6 died shocking video of incident chandrapur

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त