Pune Crime | फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने पुण्यात अनेकांची फसवणूक; आकाश मोहिते, संभाजी निवंगुणे व पोपट निवंगुणे यांना अटक, जाणून घ्या प्रकरण

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पुण्यातील (Pune Crime) हवेली तालुक्यातील साई अंगण फेज 2 (Sai Angan Phase 2) मध्ये फ्लॅट देण्याचे आश्वासन घेऊन चार जणांनी अनेकांची फसवणूक करुन 1 कोटी 96 लाख 52 हजार 417 रुपये उकळल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) चार जणांविरोधात महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट (Maharashtra Ownership Flats Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे.

आकाश अरविंद मोहिते Akash Arvind Mohite (वय-40 रा. खडी मशीन चौक, कोंढवा),
संभाजी बबन निवंगुणे Sambhaji Baban Nivangune (वय-41 रा. रायकरमळा धायरी, पुणे),
पोपट गुलाबराव निवंगुणे Popat Gulabrao Nivangune (रा. धनकवडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर वैशाली/वृषाली आकाश मोहिते (वय-36 रा. खडी मशीन चौक, कोंढवा) यांच्याविरोधात गुन्हा (MOFA) दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संतोष रामचंद्र साळवी (रा.46 रा. गल्ली क्र.29 जनता वसाहत, पर्वती) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी व इतर लोकांना साई अंगण फेज 2 मध्ये फ्लॅट देतो असे सांगून 2015 मध्ये पैसे घेतले.
फिर्यादी आणि इतरांनी अनेकवेळा फ्लॅट संदर्भात आरोपींकडे विचारणा केली.
त्यावेळी आरोपीनी लवकरच फ्लॅटचा ताबा देतो असे वारंवार सांगितले.
फिर्यादी यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नसल्याने फिर्य़ादी व इतरांनी आरोपींकडे विचारणा केली.
त्यावेळी आरोपींनी माझ्या विरोधात तक्रार केली तर बिल्डींग पाडण्याची धमकी देत फसवणूक केली.
दरम्यान, आरोपींनी बनावट दस्तऐवज तयार करुन फ्लॅटची दोन जणांना विक्री केली.
संतोष साळवी यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात (sinhagad police station) दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली.
पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Many cheated in Pune under the pretext of buying flats; Akash Mohite, Sambhaji Nivangune and Popat Nivangune arrested, find out the case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Parambir Singh | मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंह यांना 25 हजार रुपयांचा दंड, चांदीवाल कमिटी समोर गैरहजर

Pune Crime | पुण्यातील उद्योजक गायकवाड बाप-लेकास तब्बल ‘एवढया’ दिवसांची पोलिस कोठडी

Korean Glass Skin | कोरियन मुलींप्रमाणे त्वचा मिळवायची आहे का? तर ‘हे’ नक्की करा !