Pune Crime | चाकण एमआयडीसीमधील ATM चा भीषण स्फोट; पहाटेच्या सुमारास घडला प्रकार

पुणे : Pune Crime | चाकण येथील एमआयडीसी (Chakan MIDC) परिसरात असलेल्या एका एटीएमचा (ATM) पहाटे स्फोट (explosion) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.(Pune Crime)

चाकण परिसरातील आंबेठाण गावाजवळील (Ambethan village) भांबोली फाट्यावर हिताची बँकेचे एटीएम सेंटर (Hitachi Bank ATM Center) आहे. या एटीएम सेंटरमध्ये पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक कानठळ्या बसविणारा आवाज होऊन मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्यात या एटीएम सेंटरचा दरवाजा लांबवर जाऊन पडला. एटीएम मशीन पूर्णपणे जळून खाक झाले आहे. एटीएम सेंटरच्या आजूबाजूंच्या काचांचा चक्काचूर झाला आहे. दरवाजाच्या सांगाडे पुढच्या बाजूला उडाले आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस दलातील बॉम्बनाशक पथक व श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. इतका मोठा स्फोट नेमका कशामुळे घडला याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही. या स्फोटात सुदैवाने कोणीही जखमी झालेले दिसून आले नाही. चाकण पोलीस ठाण्याचे (Chakan Police Station) वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून स्फोटाच्या कारणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Aadhaar Card Update | आधार लॉक आणि अनलॉक करून आपली आयडेंटिटी करा सुरक्षित, इथं जाणून घ्या सोपी पद्धत

IRCTC | ट्रेनमधील कोणतंही बर्थ रिकामं झालं तर येईल अलर्ट, मिळेल कन्फर्म तिकीट; जाणून घ्या IRCTC ची ‘ही’ नवीन सुविधा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Massive explosion at ATM in Chakan MIDC; The type that happened around dawn

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update