IRCTC | ट्रेनमधील कोणतंही बर्थ रिकामं झालं तर येईल अलर्ट, मिळेल कन्फर्म तिकीट; जाणून घ्या IRCTC ची ‘ही’ नवीन सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेकडे आतापर्यंत ही सुविधा नव्हती की जर एखाद्या ट्रेनमध्ये एखादी सीट रिकामी झाली तर त्याची माहिती कन्फर्म तिकिट नसलेल्या प्रवाशाला कशी मिळणार. IRCTC आता आपल्या प्रवाशांना ही सुविधा देत आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने पुश नोटिफिकेशन (Push Notifications) ची सुविधा सुरू केली आहे.

या सुविधेतून यूजर्सला सीटच्या उपलब्धतेसह अनेक प्रकारची माहिती मिळू शकते. IRCTC ने अलिकडेच आपली वेबसाइट अपडेट केली आहे, ज्यामध्ये अनेक सुविधांचा समावेश केला आहे. जेव्हा एखाद्या ट्रेनमध्ये सीट रिकामी होईल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन यूजर्सच्या मोबाइलवर जाईल. यूजर्स नंतर आपल्या सुविधेनुसार त्या रिकाम्या झालेल्या सीटसाठी बुकिंग करू शकतो. यासाठी यूजरला सर्वप्रथम IRCTC च्या वेबसाइटवर जाऊन पुश नोटिफिकेशनची सुविधा घ्यावी लागेल.

समजा तुम्ही एखाद्या ट्रेनमध्ये ठराविक तारखेसाठी सीट बुक करत आहात, परंतु ट्रेनमध्ये कोणतीही सीट उपलब्ध दिसत नाही, तर तुम्ही तिकिट बुकिंग करणार नाही. यानंतर जर एखाद्या प्रवाशाने आपले तिकिट कॅन्सल केले तर एक नोटिफिकेशन तुमच्या मोबाइलवर येईल, या एसएमएसमध्ये ट्रेन नंबरची माहिती सुद्धा असेल, ज्यानंतर तुम्ही ताबडतोब हे तिकिट बुक करून प्रवास करू शकता.

जेव्हा तुम्ही IRCTC ची वेबसाइट उघडाल तेव्हा तुम्हाला पुश नोटिफिकेशनचा पर्याय मिळतो.
ग्राहक ही विशेष सेवा एकदम मोफत सबस्क्राईब करू शकतात.
यासाठी त्यांना IRCTC च्या ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन रजिस्टर करावे लागेल आणि ही सेवा सबस्क्राइब करावी लागेल.

Web Title :- irctc started new push notification to get many information like seat availability

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Porn apps Case | पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्रा आधी ‘या’ अभिनेत्रीला झाली होती अटक

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

Poonam Pandey | पूनम पांडेने देखील राज कुंद्रावर केले होते गंभीर आरोप; Video व्हायरल

Post Office News | 10 वी आणि 12 वी पास उमेदवारांना पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी ! अनेक पदांसाठी भरती अन् 81100 पर्यंत पगार, जाणून घ्या