Pune Crime | सोबतचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी, महिलेचा विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | घरकामासाठी जात असलेल्या महिलेचा हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली. अनिल सखाराम शिंदे (वय ३२, रा. दौंड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात (bund garden police station) गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला या घरकाम करतात. आरोपीने त्यांच्याकडे लग्न करण्यासाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता. त्यासाठी तो त्यांना वारंवार लग्नाची मागणी करीत त्रास देत होता.
लग्न केले नाही तर जीवे मारण्याची धमकीही दिली.
तसेच फिर्यादीसोबत काढलेले फोटो समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली.
दरम्यान, फिर्यादी या घरकामासाठी जात असताना आरोपीने त्यांचा हात धरून जबरदस्तीने जवळ ओढण्याचा प्रयत्न करीत विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

आरोपीने फिर्यादींचे जबरदस्तीने काढलेले फोटो आणि मोबाईल हस्तगत करणे,
फिर्यादीचे फोटो समाजमाध्यमावर प्रसारित केले आहेत का किंवा कोणाला पाठविले आहेत का
याचा तपास करण्यासाठी त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी द्यावी,
अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक कोळी
(API Vinayak Koli) करीत आहेत.

 

Web Title : pune crime | molestation case against anil sakharam shinde in bund gardern police station, api vinayak koli arrest shinde in this case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Earn money | YouTube चा ‘हा’ प्रोग्राम 20 लाख लोकांसाठी बनला इन्कमचे माध्यम, तुम्ही सुद्धा यातून करू शकता लाखोंची कमाई; जाणून घ्या

Modi Government | 12 कोटी लोकांवर मोदी सरकार होणार मेहरबान, वार्षिक मिळतील 12000 रुपये; जाणून घ्या

Karad Crime | 2 चिमुकल्यांची गळा दाबून हत्या; आईचा आत्महत्येचा प्रयत्न