Pune Crime | पुण्यात 30 वर्षीय तरुणाचा भल्या पहाटे खून; कोंढाव्यातील घटना

पुणे : Pune Crime | मालकाला सांगून कामावरुन काढून टाकेल, अशी धमकी देणार्‍या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन त्याचा खून (Murder) केल्याची घटना आज पहाटे कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने परिसरात खळबळ उडाली (Pune Crime) आहे.

अमोल खडके (वय 30, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कोंढवा पोलिसांनी आरोपी सुरज फाळके याला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल खडके व सुरज फाळके हे दोघे पाऊच बनविणार्‍या कंपनीत कामाला आहेत.

अमोल हा सुरजला नेहमी मालकाला सांगून तुला कामावरुन काढून टाकेन, अशी धमकी (Pune Crime) देत होता.
त्यावरुन आज पहाटे कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्यात वाद झाला.
त्यावेळी रागाच्या भरात सुरज याने अमोल याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली.
त्यात अमोल याचा मृत्यु झाला. हि घटना ‘त्या’ कंपनीच्या परिसरात झाली.
या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस (Kondhwa Police Station) घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

 

हे देखील वाचा

Monsoon in India | अखेर मान्सूनने देशातून घेतला निरोप, भारतीय हवामान विभागाची घोषणा

Pakistan captain Babar Azam | कुराणवर हात ठेवून बाबर आझमच्या ’गर्लफ्रेंड’ने घेतली शपथ, म्हणाली – ’10 वर्षापर्यंत शोषण करत होता पाकिस्तानी कर्णधार’

 

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | murder of youth in knodhwa police station area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update