Pune Crime News | गैरसमजातून 10 किलो वजनाची प्लेट मारली डोक्यात, तरुण गंभीर जखमी; धनकवडी येथील जिममधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | चिडवत असल्याच्या गैरसमजातून तरुणाच्या डोक्यात जीम मधील 10 किलो वजनाची वेट मारण्याची प्लेट मारुन गंभीर जखमी केल्याची घटना कोथरुड मध्ये घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी (Pune Police) एकाला अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.5) सायंकाळी सातच्या सुमारास धनकवडी येथील मास्टरपीस जिम (Masterpiece Jim Dhankawadi) येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत जखमी प्रणव प्रमोद मोरे Pranav Pramod More (वय-23 रा. विठ्ठल हेरीटेज सोसायटी, आंबेगाव रोड, दत्तनगर कात्रज) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) बुधवारी (दि.6) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राहुल दीपक टेकवडे Rahul Deepak Tekwade (वय-28 रा. कांचन सोसायटी, बालाजीनगर, पुणे) याच्यावर आयपीसी 326, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे धनकवडीतील चैतन्यनगर येथील मास्टरपीस जिममध्ये
व्यायाम करण्यासाठी जात असल्याने ते एकमेकांच्या तोंडओळखीचे आहेत. मंगळवारी सायंकाळी दोघेही जीममध्ये आले होते.
त्यावेळी आरोपी राहुल याला प्रणव आपल्याला चिडवत असल्याचा गैरसमज झाला.
याच रागातून त्याने जीम मधील 10 किलो वजनाचे वेट मारण्याची प्लेट प्रणवच्या डोक्यात मागील बाजूस मारली.
तसेच त्याला शिवीगाळ करुन पाहुन घेण्याची धमकी दिली. या घटनेत प्रणव गंभीर जखमी झाला असून त्याने बुधवारी सहकारनगर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपी राहुल टेकवडे याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बेरड (API Bairad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | बँकॉक-थायलंड ट्रीपच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक, पुण्यातील प्रकार

Pune Police MPDA Action | विश्रांतवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 64 वी स्थानबध्दतेची कारवाई