Pune Crime News | अनिकेत उर्फ आंड्या कोंढरे व त्याच्या तीन साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 11 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या (Bibwewadi Police Station) हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या अनिकेत उर्फ आंड्या विजय कोंढरे व त्याच्या इतर 3 साथीदारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka केली आहे. पोलीस आयुक्तांनी आजपर्यंत 11 टोळ्यांवर मोक्का कारवाई (Pune Crime News) केली आहे.

 

टोळी प्रमुख अनिकेत उर्फ आंड्या विजय कोंढरे (वय-22 रा. बिबवेवाडी), रितेश विजय कोंढरे (वय-24), अंकित उर्फ अभिषेक सोमा (वय-24 रा. कोंडवा बुद्रुक), विशाल लक्ष्मण रेणुसे (वय-22 रा. बालाजीनगर, पुणे) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी रितेश कोंढरे आणि विशाल रेणुसे यांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

 

21 डिसेंबर 2022 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कुंभारवाडा सार्वजनिक शौचालयासमोर मित्रासोबत गप्पा मारत उभ्या असलेल्या तरुणाला जुन्या भांडणाच्या रागातून रितेश कोंढरे याने डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. तर अनिकेत, विशाल, अंकित यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी जखमी तरुणाच्या मित्राच्या अंगावर धावुन जात त्यांच्या घरावर लाथा मारून खिडकीची काच फोडली. तसेच शिवीगाळ करुन कोणी मध्ये आले तर संपवून टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आयपीसी 307, 323, 504, 506, 34 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आयपीसी 385 कलमाची वाढ करण्यात आली आहे.

आरोपी अनिकेत उर्फ आंड्या कोंढरे आणि त्याच्या साथीदारांनी घातक शस्त्र बाळगणे, दुखापत करणे, लोकांना दमदाटी करुन हत्याराचा धाक दाखवून मारहाण करणे, जबरदस्तीने लुटणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी (Extortion) यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र त्यांच्यात काहीही सुधारणा झाली नाही. आरोपींनी पुन्हा अशा स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.

 

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा अंतर्भाव करण्याचा
प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता जाधव (Senior Police Inspector Sangita Jadhav)
यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ -5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh)
यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma)
यांना सादर केला होता. अपर पोलीस आयुक्तांनी कागदपत्रांची पडताळणी करुन आरोपींवर मोक्का कारवाईचे आदेश दिले.
पुढील तपास वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Purnima Taware) करीत आहेत.

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ -5 विक्रांत देशमुख,
सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता जाधव,
पोलीस निरीक्षक गुन्हे विवेक सिसाळ (Police Inspector Vivek Sisal)
तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विवेक डिगे (PSI Vivek Digge) व पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | 11th MCOCA Mokka action by Commissioner of Police Retesh Kumaarr against Pune Criminals, Aniket alias Andya Kondhare also booked under mcoca

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mundhwa Premier League Cricket Tournament |‘मुंढवा प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धा ! महाराणा रॉयल्स् संघाला विजेतेपद

Ahmednagar ACB Trap | 10 हजार रुपये लाच घेताना महिला वैद्यकीय अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Devendra Fadnavis | देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस