Pune Crime News | खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरलेल्या 9 पैकी 2 मुलींचा बुडून मृत्यु; बुलढाणा जिल्ह्यातील मुली

पुणे : Pune Crime News | खडकवासला (Khadakwasla Dam) येथील गोर्‍हे खुर्द (Gorhe Khurd) येथील बॅक वॉटरमध्ये (Khadakwasla Back Water) पोहण्यासाठी उतरलेल्या ९ मुली बुडल्या असल्याचे पाहून गावकर्‍यांनी धाव घेऊन ७ जणांना वाचविण्यात यश आले. दोन मुली बुडाल्या असून त्यातील एकीचा मृतदेह अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी बाहेर काढला आहे. ही घटना सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या मुली बुलढाणा जिल्ह्यातील असून सहलीसाठी आल्याची माहिती मिळत आहे.

खडकवासला बॅक वॉटरला गोर्‍हे खुर्द येथील कलमाडी हाऊस फार्मच्या मागील बाजूला ९ मुली पोहण्यासाठी पाण्यात उतरल्या. पण, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील काही जणी बुडू लागल्या.
त्यांच्यातील काही जणींनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी तेथे किनार्‍याजवळ दहाव्यासाठी गावकरी जमले होते. त्यांनी हा आरडाओरडा ऐकून ते धावत गेले.
त्यांनी बुडत असलेल्या ७ मुलींना बाहेर काढले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले.
पीएमआरडीच्या (PMRD) अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढले आहेत. (Pune Crime News)

 

आज दिनांक 15.5.2023 रोजी टकले वस्ती गोर्हे खु. येथे सकाळी 9.15 वाजता 9 मुली व महिला कपडे धुण्यासाठी नदी काठी गेले असता एक मुलगी पाय घसरून पाण्यात पडली व तिला वाचवण्याकरिता बाकी मुलींनी पाण्यात उडी घेतली.

 

पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात ओढल्या गेल्या. त्यापैकी 7 मुली व महिलांना प्रा. आ. केंद्र खानापूर येथे उपचारा करीता आणण्यात आले. त्यातील एका मुलीला पुढील उपचारा करीता संदर्भित करण्यात आले. बाकी मुली व महिला यांची प्रकृती स्थिर असून त्यांना प्राथमिक उपचार करण्यात आले.

 

2 मुलींचे मृतदेह आढळून आले व पुढील शवविच्छेदन करणेस पाठविण्यात आले.

 

त्यांचे नावे खालील प्रमाणे
1. खुशी संजय खुर्दे
2. शीतल भगवान टिटोरे

 

संदर्भित केलेले मुली

1.कुमुदिनी खुर्डे वय 10

प्राथमिक उपचार केलेले मुली
१. शीतल अशोक लहाने वय 16
२. पायल संजय लहाने वय 12
३. राशी सुरेश मांडवे वय 7
४. पल्लवी संजय लहाने वय 10
5. पायल संतोष सावळे वय 16
6. मीना लहाने वय 35

 

 

 

Web Title :- Pune Crime News | 2 out of 9 girls drowned in the water of Khadakwasla Dam; Girls of Buldhana district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Koregaon Park Police Station | पुण्यातील उच्चभ्रू परिसर कोरेगाव पार्कमध्ये नेमकं चाललंय काय? भलतेच उद्योग !

MNS Chief Raj Thackeray | ‘यांचं अस्तित्व नरेंद्र मोदीमुळे, यांना कोण ओळखतं’, राज ठाकरेंचा आशिष शेलारांना नाव न घेता टोला